शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

नवी मुंबईतील तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका; घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 12:32 AM

४४५ कुटुंबीयांचा आधार हरपला, तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे.  

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाविषयी निष्काळजीपणा तरुणाईसाठीही धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व घराचा आधार असणाऱ्या २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे. या वयोगटातील तब्बल २९ हजार २१४ जणांना कोरोची लागण झाली आहे. धोका अजून टळलेला नसल्यामुळे सर्वच वयोगटांतील नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यास महानगरपालिकेस यश येऊ लागले आहे. या आठवड्यात रग्णवाढीपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनामुक्तीची टक्केवारी धिम्या गतीने का होईना, पण सुधारू लागली आहे. प्रादुर्भाव कमी होत असला, तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. सद्यस्थितीमध्ये नागरिकांमधील विशेषत: तरुणाईमध्ये निष्काळजीपणा वाढत आहे. २० ते ५० वयोगटांतील नागरिक सर्वाधिक वेळ घराबाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. कोराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नाेकरी, व्यवसाय व अर्थार्जनासाठी तरुणाईला घराबाहेर पडावे लागत आहे. कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळताना घराबाहेर पडणे आवश्यक आहे, पण अशा वेळी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही आवश्यक आहे, परंतु अनेक जण नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे प्रादुर्भाव होत आहे.

तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील अनेक जण कुटुंबीयांचा आधार होते. काही जण कुटुंबामधील एकटेच कमवती व्यक्ती होती. अनेक जण यशस्वीपणे व्यवसाय करत होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटमधील तरुण व्यापाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्या परिवारातील तीन जणांचा पंधरा दिवसांत मृत्यू झाल्यामुळे कुटुंबातील उर्वरित सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सीवूडमधील डॉक्टर व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, घरामध्ये फक्त तरुण मुलगा जिवंत आहे. नेरुळमधील एक तरुण वकील व सामाजिक कार्यकर्त्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्या चौकामध्ये त्यांच्या नवीन नियुक्तीचा फलक लागला होता, त्याच चौकात काही दिवसांमध्ये श्रद्धांजलीचा फलक लावावा लागला. 

नियमांचे पालन आवश्यकनोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. २० ते ५० वयोगटांत सर्वात जास्त कोरोनाची लागण झालेली निदर्शनास आले आहे. घराबाहेर गेल्यामुळे तरुणाईला कोरोनाची लागण होते व त्यांच्यामुळे घरातील इतरांनाही लागण होत आहे. यामुळे तरुणांनी स्वत:च्या कुटुंबीयांसाठी तरी नियमांचे पालन करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका