स्मार्ट सिटीतल्या महिला असुरक्षित?; अडीच वर्षांत ३७८ बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 12:16 AM2020-10-06T00:16:00+5:302020-10-06T00:16:13+5:30

फूस लावून पळवल्या जात आहेत मुली

Women in Smart City insecure ?; 378 rapes in two and a half years | स्मार्ट सिटीतल्या महिला असुरक्षित?; अडीच वर्षांत ३७८ बलात्कार

स्मार्ट सिटीतल्या महिला असुरक्षित?; अडीच वर्षांत ३७८ बलात्कार

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू लागला आहे. मागील अडीच वर्षात नवी मुंबईसह पनवेल, उरणमध्ये बलात्काराच्या ३७८ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा देशभरात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही बलात्कार करून हत्येच्या घटना देशात घडल्या आहेत. मात्र, सातत्याने घडणाºया अशा घटनांमुळे राज्यातीलही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. अशातच नवी मुंबईत समोर येऊ लागलेल्या बलात्काराच्या घटनांनी स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाºया शहराला गालबोट लागत चालले आहे. नुकतेच नेरुळ येथे १४ वर्षीय मुलीवर सातत्याने बलात्कार करून तिला गरोदर केल्याची घटना उघडकीस आली.

दरम्यान, हे प्रकरण दडपण्यासाठी तिचा गर्भपात करण्याचाही प्रयत्न झाला, परंतु हाथरस येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर येताच शहरात खळबळ उडाली. त्यामुळे नवी मुंबईतही महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मागील अडीच वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बलात्काराच्या ३७८ घटना घडल्या आहेत. त्यापैकी २०१८ मध्ये १५५ व २०१९ मध्ये १५३ घटना घडल्या आहेत, तर चालू वर्षात आॅगस्ट अखेरपर्यंत बलात्काराच्या ७० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू असतानाही त्या कालावधीतही बलात्काराच्या घटना सुरूच होत्या. मागील दोन वर्षांत बलात्काराच्या घडलेल्या घटनांमध्ये जून, जुलै व आॅक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांत सर्वाधिक गुन्हे घडले आहेत.

बलात्काराच्या घडलेल्या बहुतांश गुन्ह्यांची पोलिसांनी वेळोवेळील उकलही केलेली आहे. त्यात परिचित व अपरिचित व्यक्तींचा हात आढळून आलेला आहे, तर अडीच वर्षांत ५८० महिलांनी त्यांचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार, २०१८ मध्ये २२६, २०१९ मध्ये २५० तर चालू वर्षात आॅगस्टपर्यंत १०४ विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.

अल्पवयीन मुली वासनेच्या बळी : राज्यभर खळबळ उडवणारा सीरियल रेपिस्ट रेहान कुरेशी हाही मीरा रोड येथून येऊन नवी मुंबईतील अल्पवयीन मुलींना स्वत:च्या वासनेला बळी पाडत होता. प्रवासादरम्यान रस्ता चुकलेल्या महिलेला मदतीच्या एक तासात दोनदा गँगरेप झाल्याचीही घटना फेब्रुवारी महिन्यात रबाळे एमआयडीसी हद्दीत घडली होती. यावरून महिलांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवतील, असे गुन्हेगार शहरात मोकाट फिरत असल्याचे दिसत आहे. परिणामी, २१ व्या शतकातली स्मार्ट सिटी महिलांसाठी असुरक्षित ठरू लागल्याची भावना निर्माण होऊ लागली आहे.

दाखल झालेले गुन्हे
गुन्हा २०२० २०१९ २०१८
बलात्कार ७० १५३ १५५
विनयभंग १०४ २५० २२६

अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

चालू वर्षात आॅगस्टपर्यंत १०४ विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचेही गांभीर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Women in Smart City insecure ?; 378 rapes in two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.