शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

पनवेल महापालिकेची वाढीव मालमत्ता कर प्रणाली रद्द होणार? ५ एप्रिलला होणार विशेष महासभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 01:37 IST

Panvel Municipal Corporation : पालिका क्षेत्रात मागील कित्येक दिवसांपासून वाढीव मालमत्ता कर आकारणीवरून राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. विरोधी पक्षाच्या वतीने मागील महासभेत वाढीव मालमत्ता करावर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांनी थेट पीपीई किट घालून सभागृहात प्रवेश केला.

- वैभव गायकर पनवेल : पालिका क्षेत्रात मागील कित्येक दिवसांपासून वाढीव मालमत्ता कर आकारणीवरून राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. विरोधी पक्षाच्या वतीने मागील महासभेत वाढीव मालमत्ता करावर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांनी थेट पीपीई किट घालून सभागृहात प्रवेश केला. खारघर फोरमनेही खारघर, तळोजा, कामोठे या ठिकाणी वाढीव मालमत्ता करावरून जोरदार जनजागृती करून सत्ताधारी भाजपला टार्गेट केले आहे. सत्ताधारी भाजप वाढीव मालमत्ता करावरून नागरिकांच्या बाजूने असल्याचे सांगत आहे. या मालमत्ता करावर चर्चा करण्यासाठी  विशेष महासभेचे आयोजन  ५ एप्रिल ला होणार आहे.         १ ऑक्टोबर २०१६ रोजी स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत पूर्वाश्रमीची नगर परिषद, २९ महसुली गावे, सिडकोचे खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, नवीन पनवेल असे पाच नोड आदींचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रांचे पालिकेच्या माध्यमातून जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात एकूण ३ लाख २० हजार ८२३ मालमत्ता आहेत. संबंधित मालमत्ताधारकांकडून कर आकारणीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. पनवेल पालिकेने कर आकारणी संदर्भात प्रशासकीय ठराव क्रमांक ३१ मार्च २०१७ रोजी वाजवी वार्षिक भाडेमूल्य दर निश्चित करण्यात आले आहेत.यामध्ये वाजवी वार्षिक भाडेमूल्य कमाल ६२४ व किमान ३४३ प्रति चौ. मीटर प्रति वर्षी निश्चित केले आहे. त्यानुसार काही मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली आहे. याठरावाला सत्ताधारी भाजपने अनुकूलता दर्शविली होती तर विरोधी पक्ष सदस्य तटस्थ राहिले होते. प्रत्यक्षात या ठरावाला एकाही सदस्याने विरोध केला नसल्याचे ठरावाच्या वेळी झालेल्या मतदानात दिसून आले. पालिकेची सध्याची मालमत्ता कर प्रणाली रद्द करण्याची मागणी भाजपच्या बंडखोर नगरसेविका लीना गरड यांनी केली आहे. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या रोषावरून आक्रमक झालेले दिसून येत आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी  भाजप नागरिकांच्या बाजूने ठामपणे उभी राहील, असे सांगितले आहे. मात्र प्रत्यक्ष कर आकारणीची जबाबदारी व अधिकारी प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने आयुक्तांच्या अधिकारातच मालमत्ता कराचा अंतिम निर्णय होणार आहे. सभागृहात झालेला निर्णय प्रशासनासमोर आल्यावर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.  

टॅग्स :panvelपनवेलTaxकर