"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:15 IST2026-04-08T17:13:51+5:302026-04-08T17:15:23+5:30

Sharmila Thackeray on Ashok Kharat Case: राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत महिलांना सुनावले आहे. 

"Which woman with Ashok Kharat seems unconscious?", Sharmila Thackeray got angry, told the women | "अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले

"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले

Sharmila Thackeray Latest News: अशोक खरातविरोधातील गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केला आहे. "अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला आपल्याला बेशुद्ध वाटते? महिलांना कळायला पाहिजे की आपण काय करतो”, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. 

अशोक खरात यांच्याविरोधात पहिले पाच गुन्हे दाखल झाले. त्यातील सर्वच पीडित महिलांनी अशोक खरात गुंगीचा पदार्थ खायला देऊन अत्याचार करत असल्याचा आरोप केलेला आहे. अशोक खरातचे महिलांसोबत शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

मनसेच्या नवी मुंबई महापालिकेतील कार्यालयाचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आणि महिलांच्या भूमिकेबद्दल शंका मांडली. 

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, 'लोक वेडी झाले आहेत का?'

"भोंदूबाबांकडे जाणं बंद करा. काय हे, आपला समाज कुठे चाललाय? महाराष्ट्राला समाज सुधारकांचा वारसा आहे. संतांपासून साहित्यिकांपर्यंत... लोक वेडी झाली आहे की काय? मला काही कळत नाहीये. अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला आपल्याला बेशुद्ध वाटते? महिलांनाही कळायला पाहिजे, आपण काय करतोय", असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.    

'आम्ही त्यांच्या पाया पडणार नाही'

मनसेचे जेव्हा १३ आमदार निवडून आले होते, तेव्हा अनेक बाबा भेटायला आले होते. त्यामुळे आम्ही स्पष्ट सांगितले होते की, आम्ही त्यांच्या पाया पडणार नाही. या भेटा आणि जा", असा अनुभव शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

अशोक खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे.  आणखी ११ महिलांनी तक्रार दिली आहे. अशोक खरातविरोधातील १२ पैकी ९ गुन्ह्यांचा तपास सध्या एसआयटी करत आहेत. 

अशोक खरातचे अश्लील व्हिडीओ डिलीट

भोंदू अशोक खरातवर ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ३० साक्षीदार तपासले असून, त्यांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. खरात संबंधित ४६५० अश्लील लिंक एसआयटीच्या सायबर टिमने डिलीट केल्या आहेत. तर सोशल मीडियावरील ४५० अकाउंटदेखील कायमचे डिलीट केले आहेत. 

Web Title : शर्मिला ठाकरे ने अशोक खरात मामले में महिलाओं की भूमिका पर सवाल उठाए, आक्रोश व्यक्त किया।

Web Summary : शर्मिला ठाकरे ने अशोक खरात मामले पर गुस्सा व्यक्त किया और इसमें शामिल महिलाओं की भूमिका पर सवाल उठाया। उन्होंने बाबाओं में अंधे विश्वास और समाज की दिशा की आलोचना की, महिलाओं से अपने कार्यों के बारे में जागरूक रहने का आग्रह किया। खरात पर शोषण के कई आरोप हैं, जिनकी जांच चल रही है।

Web Title : Sharmila Thackeray questions women's role in Ashok Kharat case; expresses outrage.

Web Summary : Sharmila Thackeray expressed anger over the Ashok Kharat case, questioning the role of women involved. She criticized blind faith in babas and the society's direction, urging women to be aware of their actions. Kharat faces multiple charges of exploitation, with investigations ongoing.