शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढणार तरी केव्हा?

By admin | Updated: November 13, 2014 23:11 IST

येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-5 वरील रुळांच्या स्लीपर्स दोन वर्षापूर्वी नव्याने टाकल्यापासून या ठिकाणीही लोकलमध्ये प्रवेश करताना गॅपची समस्या भेडसावत आहे.

डोंबिवली :  येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-5 वरील रुळांच्या स्लीपर्स दोन वर्षापूर्वी नव्याने टाकल्यापासून या ठिकाणीही लोकलमध्ये प्रवेश करताना गॅपची समस्या भेडसावत आहे. यामुळे डोंबिवलीकर जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. 
यासंदर्भात माजी खासदार आनंद परांजपे आणि आमदार रवींद्र चव्हाण आदींनी सातत्याने ही समस्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांच्या निदर्शनास आणूनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी फलाट क्रमांक-5 वर दिव्याच्या दिशेने रुळांसह काही तांत्रिक कामे सुरू आहेत. त्यातच स्लीपर्स टाकण्याचेही काम करण्यात आले आहे. हा अप दिशेकडील जलद गतीचा मार्ग आहे. या ठिकाणाहून  सकाळी साडेसहापासून दुपारी चार-साडेचार्पयत गाडी पकडण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्या गर्दीत गाडीत प्रवेश करताना प्रवाशांना लोकलमधील दरवाजाच्या खांबाला पकडून वर चढावे लागत आहे. अशातच एखाद्या प्रवाशाचा तोल गेला तर अपघाताची शक्यता आहे. अनेकांना गाडीत चढता येत नसल्याने अल्पावधीत गाडी सुटण्याचीही भीती असते. याबाबत, अनेकांनी आमदार चव्हाण यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असून ते मात्र याकडे म्हणावे तितके गांभीर्याने बघत नसल्याचे स्पष्ट होत आहे. 
गेल्या आठवडय़ातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निगम यांच्यासह विठ्ठलवाडी स्थानक पाहणी दौरा केला होता. मात्र, त्यांनी डोंबिवली स्थानकाचा पाहणी दौरा का केला नाही, असा सवालही येथील महिलांसह ज्येष्ठ नागरिकांकडून केला जात आहे. आता  हिवाळी अधिवेशन सुरू होणार, त्याततरी आमच्या समस्यांवर तोडगा निघेल काय असा सवाल प्रवाशांना पडत आहे.
 (प्रतिनिधी)