‘किस’ किस लिये..
By Admin | Updated: November 11, 2014 01:06 IST2014-11-11T01:06:33+5:302014-11-11T01:06:33+5:30
‘किस ऑफ लव्ह’चं वादळ दक्षिणोतून राजधानीत धडकलंय. काहीच दिवसांत कोलकातामध्येही मास किसिंग होणारंय.

‘किस’ किस लिये..
स्नेहा मोरे/मुंबई : ‘किस ऑफ लव्ह’चं वादळ दक्षिणोतून राजधानीत धडकलंय. काहीच दिवसांत कोलकातामध्येही मास किसिंग होणारंय. कोणत्याही भावनेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणा:या व्यवस्थेला जगाच्या कानाकोप:यातून तरुणाई प्रत्युत्तर देतेय. मॉरल पोलिसिंगला यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध झाला आहे. पण ‘मॉरल पोलिसिंग’ला विरोध करण्याचा खरंच हा योग्य मार्ग आहे का..? काही यंगस्टर्सनी तर आम्हाला सहभागी व्हायचंय ‘मुंबईत कधी इव्हेंट आहे?’ असं बिनधास्तपणो विचारत जुन्या चौकटीतून कधीच बाहेर पडल्याची प्रचितीही दिलीय. ‘चुम्मेश्श’वाल्या या हटके चळवळीच्या प्रेमात आजच्या तरुणाईलाही वाहवत जायचंय हेच जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न..
कोणाचा हात धरायचा, कोणाशी कुठे बोलायचं, हे सांगायची आणि शिकवायची गरज नाहीय. दोन सज्ञान व्यक्ती जर एकमेकांच्या संमतीने जवळ आल्या तर त्यांच्यामध्ये येण्याचा अधिकार कोणालाही नाही. असे केल्याने हे प्रेमी दबून न जाता अजून उफाळून येतील हे लक्षात घेतलं पाहिजे; त्यामुळे या चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा असून मुंबईत ‘मास किसिंग’ झाल्यास मी नक्की सहभागी होईन.
- मुकुलिना कोलते, रहेजा महाविद्यालय
‘मिया-बिवी’ राजी असेल तर लोकांनी उगाच मध्ये नाक खुपसू नये आणि आता तरी या ‘किस ऑफ लव्ह’चा आदर्श घेऊन समाजाने मानसिकता बदलण्यासाठी श्रीगणोशा करावा. समाजात काही वर्गाकडून केवळ आधुनिक झाल्याचा भास निर्माण केला जातोय. त्यापेक्षा विचारात बदल घडवून प्रेमाला विरोध करणा:यांना ‘किस ऑफ लव्ह’मधून उत्तर द्यावे.
- अभिजित जगताप, एमडी महाविद्यालय
प्रेम या शब्दाचं आकाश अमर्याद आहे. प्रेम फक्त ‘त्याचं’ आणि ‘तिचं’च नसतं. ते आणखीही काही असू शकतं. ते कोणावरही करता येतं. ते व्यक्त करण्याचे आविष्कारही वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे ‘किस ऑफ लव्ह’ या मूव्हमेंटचा मी समर्थक आहे. कारण आपल्या देशात प्रेमाची भावना व्यक्त करण्यासंबंधी कोणताही कायदा नाही. त्यामुळे दोघांच्या संमतीने होत असेल तर मग काय हरकत आहे?, मुंबईत ‘मास किसिंग’मधून या चळवळीशी जोडून घ्यायला नक्कीच आवडेल. - अभिषेक खांदारे, सासमिरा महाविद्यालय
प्रेमात असणा:या ‘त्या’ दोघांची संमती असेल, तर उगाच लोकांचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. शिवाय, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहेच, त्यामुळे भावनेवर गदा आणणारा कोणताही कायदा नाही. केवळ संस्कृतीचे रक्षण यावर र्निबध घालण्यापेक्षा निखळतेने ही भावना जपली पाहिजे.
- कृतिका बागवे, सिद्धार्थ महाविद्यालय
जग बदलतंय, तेव्हा आता समाजानेही मानसिकता बदलायला हवी. ‘किस ऑफ लव्ह’मागील तरुणाईचा विचार लक्षात घेऊन पूर्वीच्या पिढय़ांनीही या विचारांना सपोर्ट केला पाहिजे. या चळवळीला विरोध करणा:यांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा आदर्श ठेवावा, उगाच आपण ‘मॉडर्न’ झालो आहोत असा आव आणण्यापेक्षा ही आधुनिकता विचारांमधून दिसून आली तर आनंदच आहे. केवळ विरोधाला विरोध ही वृत्ती घातक आहे, त्यामुळे या मूव्हमेंटला माझा सपोर्ट आहे.
- भाग्येश पाटकर, बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी
सगळेच कपल्स एकमेकांना भेटतात तेव्हा अश्लील चाळेच करतात, असं नाही. जे करतात त्यांना समज मिळायलाच हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करणा:यांनी जोशात येऊन अशी पावले उचलणं समाजाच्या मानसिकतेसाठी घातकच आहे. केरळ, दिल्ली आणि कोलकाता यानंतर आता देशभरात पसरणारी ही चळवळ एका बाजूला समाजाचा विरोध पत्करणारीही ठरतेय हे विसरून चालणार नाहीय. शिवाय, यामुळे देशाचे भविष्य असणा:या तरुणाईच्या विचारप्रवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही साशंक होईल.
- मृण्मयी सरेकर, एम.डी. महाविद्यालय
समाजात वागताना काय योग्य आणि काय अयोग्य, हा फार मोठा विषय आहे. त्याला अनेक बाजू आहेत. एखाद्याला योग्य वाटणारी गोष्ट दुस:याला पूर्णपणो अयोग्य वाटू शकते. म्हणून या चळवळीचे सपोर्टर्स आणि विरोधकांपैकी कोण योग्य-अयोग्य हा न संपणारा विषय आहे. प्रत्येक संस्कृतीचं जतन होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यात जर काही नवे प्रवाह येऊ पाहत असतील तर त्यांना किती सहजतेने आपलंसं केलं जातं अथवा केलं जात नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, शिवाय ही समाजाची परीक्षाच आहे
- अक्षया घाडी, रहेजा महाविद्यालय
केरळमधील ‘किस डे’नंतर आम्ही दिल्लीत ‘मास किसिंग’ ऑर्गनाइझ केलं. समाजात प्रेमाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणा:या प्रवृत्ती आहेत. त्यांना या चळवळीतून प्रेम निखळ भावनेची ताकद आहे; हे आम्ही दाखवून दिलं. या चळवळीला सपोर्ट करण्यासाठी फेसबुकवर ‘किस ऑफ लव्ह’मध्ये जास्तीत जास्त तरुणाईने सहभागी व्हावं आणि ‘फ्रीडम ऑफ किस’ला लाइक करावं.
- सुमित्रन, दिल्ली येथील ‘मास किसिंग’चे आयोजक, किस ऑफ लव्ह व्हॉलंटिअर
किस ऑफ लव्ह!
25 ऑक्टोबरपासून फेसबुकवर ‘किस ऑफ लव्ह’ ही कम्युनिटी सुरू झाली आणि फार कमी काळात 1 लाख 16 हजार 183 नेटिझन्सने या पेजला लाइक्स दिले आहेत. देशातील काही तरुण पिढीने एकत्र येत मॉरल पोलिसिंग आणि कल्चरल फॅसिझमविरोधात ही चळवळ उभारलीय. शिवाय, टिपिकल ‘रिव्हॉल्यूशन’च्या चौकटीला छेद देत देशाच्या कानाकोप:यात ही चळवळ पोहोचवत अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे ध्येय आहे.