शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आकाशवाणीच्या एफएम वाहिनीवर आता विविध भारती

By admin | Updated: March 18, 2015 01:59 IST

येत्या काही वर्षांत संपूर्ण देशभरात आकाशवाणीची एफएम सेवा उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राजवर्धन राठोड यांनी दिली.

मुंबई : येत्या काही वर्षांत संपूर्ण देशभरात आकाशवाणीची एफएम सेवा उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राजवर्धन राठोड यांनी दिली.
मुंबईत विविध भारती सेवेसाठी नवीन एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आलेय, त्या वेळी राजवर्धन राठोड बोलत होते. याप्रसंगी आकाशवाणीचे महासंचालक फय्याद शरयाद, प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ आणि विक्रम गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.
राजवर्धन राठोड म्हणाले, की संपूर्ण देशभरात आकाशवाणीची एफएम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी थोडा वेळ लागेल, मात्र ते नक्की होईल. सध्या देशाच्या ४० टक्के भागात एफएम सेवा उपलब्ध आहे. पुढील दोन ते अडीच वर्षांत ती ६० टक्के भागात नेण्याचा प्रयत्न आहे. देशात ४०० ट्रान्समीटर्स उपलब्ध असून, आगामी तीन वर्षांत आणखी २५० ट्रान्समीटर्स घेतले जातील. आकाशवाणी आणि दूरदर्शन हे जुन्या मित्रांप्रमाणे आहेत आणि आपण त्यांना गृहीत धरतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी आकाशवाणीवरून संवाद साधण्यामुळे आकाशवाणीला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. देशात ९२ टक्के इतकी व्याप्ती असलेल्या आकाशवाणीला प्रत्येकाच्या आयुष्यात स्थान आहे. रेडिओवरून आपल्याला माहिती, ज्ञान मिळते आणि मनोरंजनही होते. (प्रतिनिधी)

102.8
मेगाहटर््झ
एफएम विविध भारती वाहिनी १०२.८ मेगाहर्ट्झवर उपलब्ध असून, मुंबई आसपासच्या परिसरातील सुमारे दोन कोटी लोकांना तिचा लाभ होईल. मोबाइलवर तसेच प्रवासात देखील आता विविध भारतीची सेवा एफएममुळे उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे लघु आणि मध्यम लहरींवर देखील विविध भारतीचे कार्यक्रम सुरू राहतील.

भारत सरकारची कल्पना
जेव्हा देशात जनतेच्या मनोरंजनासाठी वाहून घेतलेली कोणतीही वाहिनी नव्हती, तेव्हा विविध भारतीचा
उदय झाला. त्या वेळी आपल्या शेजारी देशाचे रेडिओ सिलोन हे एकमात्र विरंगुळ्याचे साधन होते. संगीताच्या सुवर्णयुगात नागरिकांसाठी मनोरंजन वाहिनी सुरू करण्याची कल्पना भारत सरकारला सुचली आणि विविध भारती सेवेला प्रारंभ झाला.

मजबूत पकड : सुमारे सहा दशकांच्या प्रवासानंतरही आजच्या आधुनिक प्रसारण युगात विविध भारतीची पकड मजबूत आहे आणि आता एफएम च्या माध्यमातूनही अनेकांना हा आनंद उपभोगता येणार आहे.

विविध भारतीचा प्रवास : सुरुवातीला ही सेवा दिल्लीमध्ये होती. १९७२-७३ मध्ये मुंबईत चर्चगेट येथे विविध भारतीचे प्रसारण हलवण्यात आले आणि १९९८-९९ मध्ये अखेरीस ते बोरीवली येथे हलवण्यात आले. १ मे २००० रोजी थेट प्रसारण सुरू झाले, तर १६ डिसेंबर २००४ रोजी डीटीएच सेवा सुरू झाली.

पहिली उद्घोषणा १९५८मध्ये : ३ आॅक्टोबर १९५७ रोजी आकाशवाणीवरून शीलकुमार शर्मा यांच्या आवाजात पहिली उद्घोषणा झाली, ती अशी ‘यह विविध भारती हैं, आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम’ विविध भारतीवर पहिले गाणे ऐकवण्यात आले, ते होते ‘नाच रे मयूर’... विविध भारतीचे आद्यप्रवर्तक पंडित नरेंद्र्र शर्मा यांनी ते लिहिले होते आणि मन्ना डे यांनी ते गायले होते. अनिल विश्वास यांनी संगीत दिले होते. विविध भारतीवरून शास्त्रीय संगीताचा खजिना, महान कलाकारांच्या मुलाखतींचे कार्यक्रम देखील सादर केले गेले.