शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नवी मुंबईतील रुग्णालयांत नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 02:17 IST

पंधरा दिवसांपूर्वीच तपासणीचे आदेश : महापालिका रुग्णालयात आढळली होती मुदत संपलेली उपकरणे

नामदेव मोरेनवी मुंबई : स्मार्ट सिटीमधील रुग्णालयांमध्येही अग्निशमन नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. २१ डिसेंबरला नेरुळमधील मनपा रुग्णालयास आयुक्त अभिजीत बांगर यांनी अचानक भेट दिली असताना, तेथील अग्निशमन उपकरणांची मुदत संपल्याचे निदर्शनास आले होते. त्याच वेळी आयुक्तांनी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. 

भंडाऱ्यामध्ये लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात आग लागून दहा मुलांचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईमध्ये २१६ खासगी व सहा पालिकेची रुग्णालये आहेत. यामध्ये दोन वैद्यकीय महाविद्यालय, दोन दंतवैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. अनेक रुग्णालयांमध्ये अग्निशमन नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नेरुळमधील मीनाताई ठाकरे रुग्णालयात आयुक्तांनी भेट दिल्यानंतर, तेथील अग्निशमन उपकरणांची मुदत संपल्याचे निदर्शनास आले. शहरातील इतरही अनेक रुग्णालयांमध्ये हीच स्थिती आहे. ७० टक्के रुग्णालयांमध्ये फायर एक्झिटची सुविधाच नाही. जिथे आहे, त्या ठिकाणी इतर साहित्य ठेवले आहे. रुग्णालयात आपत्कालीन स्थितीमध्ये काय करायचे, याविषयी सूचना फलकही लावले नाहीत. पालिका रुग्णालयातही फारशी वेगळी स्थिती नाही. यामुळे आग लागल्यास रुग्णांना बाहेर काढणे अशक्य होणार आहे.

नियमांप्रमाणे प्रत्येक रुग्णालयाने दर सहा महिन्यांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून दाखला घेणे आवश्यक आहे. रुग्णालय व्यवस्थापन दाखना घेते, परंतु प्रत्यक्षात रुग्णालयामधील अनेक उपकरणे चालू नसतात. शहरात भंडाराप्रमाणे दुर्घटना होऊ नये, यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व रुग्णालयांना अग्निशमन उपकरणे तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत. जे नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पंधरा दिवसापूर्वी नेरुळ रुग्णालयास भेट दिली असताना, अग्निशमन उपकरणांची मुदत संपल्याचे निदर्शनास आले होते. त्याच वेळी सर्व रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही दिले आहेत.    - अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका

मेडिकल, छोट्या दवाखान्यांचेही दुर्लक्षशहरात मेडिकल व छोट्या क्लिनिकची संख्याही वाढत आहे. नियमाप्रमाणे या सर्व अस्थापनांमध्ये फायर एक्स्टिंग्युशर असणे आवश्यक आहे, परंतु शहरातील अनेक मेडिकलला जनरल स्टोअर्सचे स्वरूप आले आहे. औषधांशिवाय इतर वस्तुंचीही विक्री केली जात असून, या मधील अनेक दुकानांमध्ये अग्निसुरक्षेसाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. छोट्या क्लिनिकमध्येही सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अग्निशमन दलाचाही निष्काळजीपणारुग्णालयांनी प्रत्येक सहा महिन्यांनी अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. अग्निशमन विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाते, परंतु संबंधित रुग्णालयांची काटेकोर तपासणी केली जात नाही. नियम तोडणारांवर प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. कारवाई होत नसल्यामुळे नियमांचे पालन होत नाही.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल