शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन, तलवार बाळगणाऱ्या ट्रेलर चालकास अटक
By नामदेव मोरे | Updated: September 5, 2022 17:51 IST2022-09-05T17:51:36+5:302022-09-05T17:51:57+5:30
शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन, तलवार बाळगणाऱ्या ट्रेलर चालकास अटक
नवी मुंबई : उरण मधील अक्डस मॅरीटाईम यार्ड चिर्ले येथे ३३ इंच लांबीची तलवार बाळगल्याप्रकरणी रणजितसिंग नावाच्या ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे. शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चिर्ले येथील मॅरीटाईम यार्ड मध्ये एक ट्रेलर चालकाकडे तलवार असल्याची माहिती तेथील यार्डमधील व्यवस्थापकाने पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने घटनास्थळी येऊन रणजिसिंग याची विचारपूस केली असता त्यांनी उडवाडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
त्याची कसून चौकशी केली असता तो पीबी ०६ एझेड ७७७२ या ट्रेलरवर चालक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. त्याच्या ट्रेलरची झडती घेतली असता तेथे ३३ इंच लांबीची व दोन्ही बाजूला धार असलेली तलवार आढळून आली. तलवार जप्त करून त्याच्याविरोधात उरण पोलिस स्टेशनमध्ये हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.