शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नेरुळ ते सीबीडीपर्यंत वाहनांच्या रांगा; अपघातामुळे पाच तास कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:48 PM

सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा उड्डाणपुलावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी डांबरीकरणाच्या ऐवजी काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी ७ वाजता ट्रेलर व डम्परचा अपघात झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तब्बल पाच तास वाहतूककोंडी झाली होती. नेरुळ ते सीबीडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला उड्डाणपुलावर पहाटे ट्रेलर बंद पडला. ७ वाजण्याच्या सुमारास बंद पडलेल्या ट्रेलरला डम्परने धडक दिली. डम्परमधील खडी रोडवर पसरली. यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलीस निरीक्षक किसन गायकवाड व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. उड्डाणपुलावरील एक लेन वगळता इतर वाहतुकीसाठी खुल्या ठेवल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने तत्काळ हटविण्यात आली. दुपारी १२ च्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने पुलावरील सर्व खडी डम्परमध्ये भरली. सकाळी मुंबईकडे जाणाºया वाहनांची संख्या जास्त असते. अपघातामुळे बसने नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी जाणाºया नागरिकांची गैरसोय झाली.

अपघातानंतर चार किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. नेरुळ एलपी, उरण फाटा व सीबीडीमध्ये रस्ता ओलांडून दुसºया दिशेने जाणाºया वाहनांनाही अडथळा निर्माण झाला होता. या तीनही ठिकाणी महामार्गावर पुण्याकडे जाणाºया दिशेला वाहतूककोंडी झाली झाल्याने पोलिसांना कसरत करावी लागली.महामार्गावर नेरुळ पुलावर अपघात झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुलावरील खडी जेसीबीने उचलून वाहतूक सुरळीत करण्यात आली. - किसन गायकवाड, पोलीस निरीक्षकदुरुस्तीच्या कामाचाही फटकासायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा उड्डाणपुलावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी डांबरीकरणाच्या ऐवजी काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामामुळेही सकाळी व सायंकाळी महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. रात्री ७ ते ९ दरम्यान उरण फाटा परिसरात चक्काजाम होत आहे.अवजड वाहनचालकांकडून नियम धाब्यावरमहामार्गावर अवजड वाहनांचे चालक नियम धाब्यावर बसवत आहेत. रात्री वाशी, सानपाडा, नेरुळ, तुर्भे, सीबीडीमध्ये खासगी बसेस रोडवर उभ्या केल्या जात आहेत. यामुळेही महामार्गावरील वाहतूककोंडी होत आहे. ट्रेलर व ट्रकचालकही रोडवरच वाहने उभी केल्यामुळेही वाहतूककोंडी होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडीAccidentअपघात