लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई: आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. मटार ४० रुपये किलो, तर टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो दराने किरकोळ मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे. कोबी, फ्लॉवर, दुधी भोपळा व इतर वस्तूंचे दरही कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोणावळा घाटात झालेल्या अपघातामुळे दोन दिवस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली होती. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर शुक्रवारी आवक पूर्ववत झाली आहे. नाशिक, पुणे, सातारा व इतर ठिकाणावरून ५८७ ट्रक, टेम्पोमधून ३२०० टन आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४२८ टन टोमॅटोची आवक झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटो १० ते २० रुपये व किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.
एपीएमसीत ३५८ टन वाटाण्याची आवक झाली. घाऊक बाजारात वाटाणा २२ ते २६ रु. किलो व किरकोळमध्ये ४० ते ५० रु. किलो दराने विक्री होत आहे. दुधी भोपळा, वांगी, कारली, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची या सर्वांचे दर प्रतिकिलो शंभर रुपयांपेक्षा कमी आहेत.
| वस्तू | घाऊक दर | किरकोळ दर |
|---|---|---|
| मेथी | ३० ते ७० | ८० ते ९० |
| दुधीभाजी | १५ ते २२ | ५० ते ६० |
| फरसबी | २५ ते २९ | ६० ते ८० |
| पालक | १० ते १५ | ५० ते ६० |
| कारली | १५ ते २० | ७० ते ८० |
| काकडी | ३० ते ४४ | ६० ते ८० |
गवारचे भाव अद्यापही तेजीत
गवारचे दर अद्याप तेजीत आहेत. घाऊक बाजारात ५० ते ८० व किरकोळमध्ये १४० ते १६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात शिराळी-दोडका १४० ते १६० रुपये, तोंडली १२० ते १६० रुपये किलो दराने विकली जात आहेत. या व्यतिरिक्त इतर वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
Web Summary : Vegetable prices in Navi Mumbai have fallen due to increased supply. Tomatoes are ₹30-40/kg, peas ₹40/kg. Other vegetables like cauliflower and bottle gourd are also cheaper, providing relief to consumers. However, gourds remain expensive, selling up to ₹160/kg in retail markets.
Web Summary : नवी मुंबई में आवक बढ़ने से सब्जियों के दाम गिरे। टमाटर ₹30-40/kg, मटर ₹40/kg है। फूलगोभी और लौकी जैसी अन्य सब्जियां भी सस्ती हैं, जिससे उपभोक्ताओं को राहत मिली है। हालांकि, लौकी अभी भी महंगी है, खुदरा बाजारों में ₹160/kg तक बिक रही है।