निर्मळ यात्रेसाठी वसई होते आहे सज्ज
By Admin | Updated: November 12, 2014 22:52 IST2014-11-12T22:52:25+5:302014-11-12T22:52:25+5:30
ऐतिहासिक निर्मळ यात्र 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबई ठाण्यासहीत शेजारच्या गुजरात राज्यातुनही भाविक येत असतात.

निर्मळ यात्रेसाठी वसई होते आहे सज्ज
दीपक मोहिते ल्ल वसई
ऐतिहासिक निर्मळ यात्र 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबई ठाण्यासहीत शेजारच्या गुजरात राज्यातुनही भाविक येत असतात. यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी निर्मळ समाधीस्थळ (मंदिर) परिसरात रोषणाई केली जाते.
मंदिरासमोरील रस्त्याच्या दुतर्फा भागात विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात येत असतात. लहान मुलांसाठी विविध खेळण्यांची दुकाने तसेच आकाश पाळणो लावण्यात येत आहेत. तसेच महिलांसाठी शुंगाराची साधने, मिठाई, भांडी, कपडे इ. दुकाने लक्ष वेधून घेत आहेत. या निर्मळ यात्रेत महाराष्ट्र व गुजरात भागातील शेकडो व्यापारी आपले स्टॉल उभारतात. यात्र काळात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असते. सायंकाळी 4 वाजता सुरू होणारी ही यात्र रात्री उशीरार्पयत सुरू असते. गिरीज-नाळा रस्त्यावरील वाहतुक अन्य मार्गावरून वळवण्यात येत असते. या यात्रेदरम्यान महसुल व पोलीस यंत्रणा चोख बंदोबस्त ठेवत असतात. नागरीकरणासमवेत अनेक भागातील यात्र कमी होत जात आहेत परंतु निर्मळ यात्र उत्साहात भरते.
निर्मळ गावातील वातावरण निसर्गरम्य तर आहेच. शिवाय येथे विस्तीर्ण तलाव आणि मंदिर आहे. या तलावाची निर्मिती परशुरामाने केल्याची नोंद पद्म पुराणात आहे. निर्मळ येथे आठवे जगत्गुरू o्री शंकराचार्य विद्याशंकर भारती यांची समाधी आहे. इसवी सन 1387 मध्ये त्यांनी समाधी घेतली. या समाधी मंदिराच्या पश्चिमेस सुळेश्वराचे मंदिर तर समाधीच्या उजव्या बाजुला निर्मळेश्वराची पिंडी आहे. मंदिराच्या सभोवताली अनेक देवा-देवींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. वसई विजयानंतर चिमाजी आप्पांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर 1988 मध्ये भाऊसाहेब वर्तक यांनी पुन्हा मंदिराचा जिर्णोद्धार करून विस्तिर्ण मंदिर बांधले तर अंदाजे 3क्क् वर्षापुर्वी निर्मळ यात्रेला सुरूवात झाल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली.