शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी सोशल मीडियाचा वापर

By admin | Updated: January 4, 2016 02:07 IST

स्वच्छ आणि स्मार्ट शहराची ओळख असलेल्या नवी मुंबईतील सुविधाही आता तितक्या स्मार्ट होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवीन वर्षातील पहिल्याच आठवड्यापासून

नवी मुंबई : स्वच्छ आणि स्मार्ट शहराची ओळख असलेल्या नवी मुंबईतील सुविधाही आता तितक्या स्मार्ट होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवीन वर्षातील पहिल्याच आठवड्यापासून एक नवीन उपक्रम राबविला जात आहे. स्वाच्छ शहराच्या या अपक्रमात सोशल मीडियाचा वापर करुन नागरिकांना आता 9769894944 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर स्वच्छतेविषयीची तक्रार/सूचना नोंदविता येणार आहे. मागील वर्षभर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच नागरिकांना सुलभ होतील व शहर स्वच्छतेत भर घालतील अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याच अनुषंगाने नववर्षाच्या पहिल्यात आठवड्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या २४ व्या वर्धापनिदनाचे औचित्य साधून सध्याची जनमानसांमधील सोशल मिडीया त्यातही विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप वापराची लोकप्रियता लक्षात घेता महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहर स्वच्छतेसाठी 9769894944 हा व्हॉट्सअ‍ॅप मोबाईल क्र मांक नागरिकांच्या सोयीसाठी १ जानेवारीपासून सुरू केला आहे. नागरिक या क्र मांकावर आपल्या स्वच्छतेविषयीच्या तक्र ारी, मौल्यवान सूचना छायाचित्रांसह पाठवू शकतात अशी माहिती देत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी यामधून नागरिकांना अपेक्षति आवश्यक ठिकाणी अधिक तत्पर व समाधानकारक सेवा उपलब्ध होईल आणि याव्दारे शहर स्वच्छता कार्यास गतिमानता येईल असा विश्वास व्यक्त केला. शिवाय ही व्हॉटसअ‍ॅप सेवा २४ बाय ७ उपलब्ध असणार असल्याने शहर स्वच्छतेच्या दृष्टीने कृतिशीलता वाढीस लागणार आहे.शहर स्वच्छतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका कटीबध्द असून व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल क्र मांक सुविधेमुळे शहरातील स्वच्छतेवर आणखी भर देऊन स्वच्छ शहराची संकल्पना सत्यात उतरविली जाणार आहे. ओला व सुका कचऱ्याचे नागरिक पातळीवरच वर्गाकरण व्हावे ही भूमिका असून यादृष्टीने शहरातील काही मोठ्या सोसायट्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात कचरा वर्गीकरण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र यात सर्वांचाच व्यापक सहभाग अपेक्षति असून इतरही सोसायट्या, वसाहतींनी सामाजिक कर्तव्याच्या भावनेने ओला व सुका कचरा निर्माण होतो तिथेच म्हणजे नागरिक पातळीवरच वर्गीकृत करावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी केले आहे.