शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

युतीच्या मताधिक्यामुळे आघाडीत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 11:27 PM

लोकसभा निवडणुकांनंतर देशात पुन्हा एकदा बहुमताने भाजप सरकार सत्तेवर आले आहे.

- वैभव गायकर पनवेल : लोकसभा निवडणुकांनंतर देशात पुन्हा एकदा बहुमताने भाजप सरकार सत्तेवर आले आहे. या निकालांचा परिणाम विधानसभा निवडणुकांवरही होणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेली मते पाहता, या मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी राजकीय गणिते जुळवण्यास सुरुवात केली आहे.मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल विधानसभा क्षेत्र सर्वात मोठे विधानसभा क्षेत्र आहे. या ठिकाणी युतीला मिळालेल्या मताधिक्यामुळे विरोधी पक्षांतही अस्वस्थता पसरली आहे. पनवेलमध्ये आतापर्यंत पार पडलेल्या निवडणुकांमध्ये शेकापने अटीतटीची लढत दिली आहे. मात्र, लोकसभा मतदारसंघात पनवेलमध्ये सुमारे ५४ हजारांची लीड पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती रणनीती आखावी, याबाबत आघाडीने विचारमंथन करण्याची गरज आहे. लोकसभेच्या निकालावरून देशात मोदीलाट अस्तित्वात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.देशभरातील मोदीलाटेचा विचार केल्यास, पनवेलमधून भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दृष्टीने ही निवडणूक नक्कीच सोपी झाली आहे. २०१४ रोजी त्यांना १ लाख २५ हजार १४१ मते मिळाली होती. केवळ १३,५०० मतांनी ते विजयी झाले होते. या वेळी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना १ लाख ११ हजार ९२७, शिवसेनेच्या वासुदेव घरत यांना १७ हजार ९५३ मते मिळाली होती.गेल्या पाच वर्षांत पनवेल विधानसभा मतदारक्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. शहरी मतदारांचा वाढलेला टक्का हा भाजपसाठी फायद्याचा ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता पनवेलकरांनी दिली.>विधानसभेची वाट मित्रपक्षांसाठी बिकटशेकापचे तालुक्यातील नेते भाजपच्या संपर्कात आहेत. यातच शेकापच्या दोन नगरसेविकांच्या पतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नगरसेविकादेखील कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, त्यामुळे २०१९ ची विधानसभेची वाट शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस या आघाडीतील मित्रपक्षांसाठी बिकट होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :parth pawarपार्थ पवारMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019maval-pcमावळ