अपघातात रोडपाली येथील दोन भावंडांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 22:16 IST2020-02-07T22:15:44+5:302020-02-07T22:16:38+5:30

अचानक झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Two siblings died in road accident | अपघातात रोडपाली येथील दोन भावंडांचा मृत्यू

अपघातात रोडपाली येथील दोन भावंडांचा मृत्यू

ठळक मुद्दे सुशांत सदाशिव ठाकूर (27 )व प्रफुल बाळकृष्ण ठाकूर (23) असे मृत युवकांचे नाव असून ते दोघे चुलत भाऊ होते. यातील सुशांत ठाकूर याचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. शिवाय येत्या एप्रिल महिन्यात त्याचं लग्न होणार होतं.

पनवेल - रोडपाली गावातील दोन तरुणांचा आज शुक्रवार दि.7  रोजी पहाटे झालेल्या मोटारसायकल अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुशांत सदाशिव ठाकूर (27 )व प्रफुल बाळकृष्ण ठाकूर (23) असे मृत युवकांचे नाव असून ते दोघे चुलत भाऊ होते. भरधाव येणारे अवजड वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून अचानक झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
 

यातील सुशांत ठाकूर याचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. शिवाय येत्या एप्रिल महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. पहाटे लवकर मुंबईच्या चोर बाजारात (नळ बाजारात) वस्तू स्वस्त मिळतात अशी माहिती असल्यामुळे दोघे भाऊ पहाटे साडेचारच्या सुमारास मोटरसायकलवरून निघाले होते. नवी मुंबईतील वाशी याठिकाणी पोहोचल्यावर भरधाव येणारे अवजड वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ज्या मोटर सायकलवरून ते प्रवास करत होते त्या मोटार सायकलला काहीही झालं नाही. आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्यामुळे नेमक्या कोणत्या वाहनाने धडक दिली हे मात्र समजू शकले नाही.

Web Title: Two siblings died in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.