नवीन पनवेल: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून ज्वारी घेऊन जाणारा ट्रक उड्डाणपूलावरून पलटी झाल्याची घटना सोमवारी (16 सप्टेंबर) पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला, अशी माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली.
ज्वारीची पोती असलेला ट्रक (केए 32 सी 3718) मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून वाशीच्या दिशेने येत होता. 16 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास नवीन पनवेल सेक्टर सहा जवळील नेवाळीकडे जाणाऱ्या उड्डाण पूलाजवळ आला असता ट्रक खाली कोसळला.
हा अपघात इतक भयावह होता की या ट्रकची दोन चाके वरच अडकली आणि ट्रक खाली कोसळला. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सुदैवाने ज्यावेळी ट्रक उड्डाणपूलावरून खाली कोसळला, त्यावेळी या ठिकाणाहून वाहनांची रहदारी कमी होती. वर्दळ जास्त असती तर मोठी दुर्घटना घडली असती.