नवी मुंबईत वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 10:23 IST2018-09-05T10:20:39+5:302018-09-05T10:23:24+5:30
मुंब्रा हायवेला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या एका वाहतूक पोलिसाचा वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी मुंबईत वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसाचा मृत्यू
नवी मुंबई - मुंब्रा हायवेला वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेलेल्या एका वाहतूक पोलिसाचा वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अतुल गागरे असे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते तळोजा वाहतुक शाखेत कार्यरत होते.
बुधवारी (5 सप्टेंबर) पहाटे पाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनांविरोधात व वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.