थर्टी फर्स्टची पार्टी ठरली मायलेकासाठी काळरात्र; समलैंगिक संबंधासाठी तगादा लावल्याने हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:24 IST2025-01-03T14:23:55+5:302025-01-03T14:24:38+5:30
नवीन पनवेल : थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी घरी आलेल्या तरुणांकडे समलैंगिक संबंध ठेवण्याचा तगादा लावल्याने संतापलेल्या दोघांनी मायलेकाचा खून केला. ...

थर्टी फर्स्टची पार्टी ठरली मायलेकासाठी काळरात्र; समलैंगिक संबंधासाठी तगादा लावल्याने हत्या
नवीन पनवेल : थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी घरी आलेल्या तरुणांकडे समलैंगिक संबंध ठेवण्याचा तगादा लावल्याने संतापलेल्या दोघांनी मायलेकाचा खून केला. खून करणाऱ्यांना उलवे परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती गुरुवारी परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. संज्योत दोडके (१९) शुभम नारायणी (१९) अशी आरोपींची नावे आहेत.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कामोठे, सेक्टर सहा येथील ड्रीम सोसायटीतील एका घरातून गॅसचा वास येऊ लागला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्यांनी प्रसंगावधान राखत घराचे दार ठोठावले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा उघडला असता ४५ वर्षीय जितेंद्र जग्गी व त्याची आई गीता जग्गी (७०) मृतावस्थेत आढळून आले. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास कामोठे पोलिसांसह गुन्हे शाखेची पथकेही करू लागले. तपासादरम्यान पोलिसांनी उलवे परिसरातून संज्योत दोडके व शुभम नारायणी यांना अटक केली. या दोघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
असा घडला गुन्हा
- थस्टी फर्स्टच्या पार्टीत मद्य प्राशन केल्यानंतर १ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास जितेंद्र याने आरोपींकडे समलैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला.
- याचा राग आल्याने शुभमने जितेंद्रच्या डोक्यात एक्सटेंशन बोर्डने मारून त्याला जिवे ठार मारले. त्यानंतर त्याची आई गीता हिचा संज्योतने गळा आवळला, अशी माहिती पोलिसांनी दिली.