शिकारी खुद यहा शिकार हो गया! कारवाईस गेलेल्या वनअधिकाऱ्यांवर ओढवली नामुष्की
By नारायण जाधव | Updated: September 16, 2022 15:37 IST2022-09-16T15:36:57+5:302022-09-16T15:37:44+5:30
...यामुळे शिकारी खुद यहा शिकार हो गया, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

शिकारी खुद यहा शिकार हो गया! कारवाईस गेलेल्या वनअधिकाऱ्यांवर ओढवली नामुष्की
नवी मुंबई - येथे भूमाफियांकडून मोठ्याप्रमाणात एमआयडीसी, सिडको, वन आणि महसूल विभागाच्या जागेवर अतिक्रमण होत आहे. गुरूवारी खारघर येथे ५०० खारफुटींची कत्तल करून भराव टाकत भूखंड हडप केल्याची तक्रार आल्यानंतर, कारवाईस गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर विचित्र नामुष्की ओढवली. त्यांचे वाहन तेथील चिखलात अडकले. यामुळे, कारवाई करण्याऐवजी, तेथील कामगारांना अडकलेल्या वाहनास धक्का मारण्यास सांगण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आणि त्यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. ही घटना गुरूवारी घडल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
यामुळे शिकारी खुद यहा शिकार हो गया, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. सिडकोने आपल्या अखत्यारीतील सर्व खारफुटी वन विभागाकडे सुपूर्द केल्याचा दावा केला आहे. पर्यावरण प्रेमींच्या तक्रारींची दखल घेत, नवी मुंबई खारघर संवर्धन युनिटने एकट्या खारघरमध्ये किमान 500 खारफुटींचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. यावर खारफुटी युनिटचे परिक्षेत्र वन अधिकारी एम एल मांजरे यांनी महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केली.
यानंतर गुरुवारी खारघर येथे महसूल विभागाचे अधिकारी तपासणीसाठी गेले असता त्यांचे वाहन गाळात अडकले. तेव्हा त्यांनी तेथील कामगारांनाच धक्का मारण्यासाठी बोलावून, कारवाई न करतात स्वतःची सुटका करून घेतली