तळोजा येथे क्रेन तुटली; चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 06:15 IST2022-06-29T06:13:24+5:302022-06-29T06:15:02+5:30

सतरा मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक संध्याकाळी क्रेन तुटून कोसळली, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. तुटलेल्या क्रेनचा काही भाग तेथील एका कारवर पडला.

The crane broke at Taloja; Four people died | तळोजा येथे क्रेन तुटली; चार जणांचा मृत्यू

तळोजा येथे क्रेन तुटली; चार जणांचा मृत्यू

पनवेल: तळोजा फेज २ सेक्टर ३६ मध्ये सिडकोच्या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता क्रेन तुटून झालेल्या अपघातात चार मजुरांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात 
आला आहे. 

एवढ्या मोठ्या दुर्घटनेची माहिती सिडकोच्या नियंत्रण कक्षास उशिरापर्यंत मिळाली नव्हती. हे बांधकाम शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या घरांची निर्मिती केली जात आहे. जखमींना उपचारासाठी कामोठे एमजीएम येथे दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी कामगारांना मृत घोषित केले. 

 

Web Title: The crane broke at Taloja; Four people died