रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:02 IST2025-10-11T15:01:49+5:302025-10-11T15:02:40+5:30
नवीन पनवेल : पनवेल शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळून गेल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ...

रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला
नवीन पनवेल : पनवेल शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळून गेल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी तळोजा पोलीस अधिक तपास करत आहेत.
खुटारी येथील राजकुमार म्हात्रे याच्यावर सप्टेंबर 2025 प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर पनवेल मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अनिकेत म्हात्रे आणि राजकुमार म्हात्रे यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सप्टेंबर महिन्यात दाखल करण्यात आला. 10 ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आरोपी राजकुमार म्हात्रे रुग्णालयातून पळून गेला. तळोजा पोलीस रुग्णालयातून आरोपीला ताब्यात घेणार होते, मात्र त्यापूर्वीच आरोपीने पलायन केले. याप्रकरणी तळोजा पोलीस त्याचा शोध घेत आहेत