पनवेलजवळ केमिकलनं भरलेला टँकर उलटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 09:11 IST2018-06-11T09:11:15+5:302018-06-11T09:11:15+5:30
सायन-पनवेल महामार्गावर केमिकलनं भरलेल्या टँकरचा अपघात झाला आहे.

पनवेलजवळ केमिकलनं भरलेला टँकर उलटला
पनवेल - सायन-पनवेल महामार्गावर केमिकलनं भरलेल्या टँकरचा अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कोपरा उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामुले टँकरमधील केमिकल रस्त्यावर सांडले होते. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली, मात्र मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडल्याने एक लेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच खारघर वाहतूक पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.