वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 13:53 IST2019-01-05T13:43:15+5:302019-01-05T13:53:03+5:30
स्वच्छ भारत अभियानाच्या कामाकडे दुर्लक्ष, नागरिकांच्या तक्रारी व आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यास हजर न राहता विनापरवानगी सुट्टी घेतल्यामुळे आयुक्त रामास्वामी एन यांनी ठोके यांना निलंबित केले आहे.

वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांचे निलंबन
नवी मुंबई - स्वच्छ भारत अभियानाच्या कामाकडे दुर्लक्ष, नागरिकांच्या तक्रारी व आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यास हजर न राहता विनापरवानगी सुट्टी घेतल्यामुळे आयुक्त रामास्वामी एन यांनी महेंद्रसिंग ठोके यांना निलंबित केले आहे.
नवी मुंबईमधील सर्वात महत्त्वाचा प्रभाग म्हणून वाशीची ओळख आहे. काही महिन्यांपासून या परिसरात अनधिकृत फेरीवाले वाढले आहेत. नागरिकांनी तक्रारी करूनही ठोके यांनी ठोस कारवाई केलेली नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या कामाकडेही दुर्लक्ष केले जात होते. आयुक्त रामास्वामी एन यांनी वाशी परिसरात पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी ठोके अनुपस्थित राहिले. परवानगी न घेता महापालिका मुख्यालयाबाहेर गेले. यामुळे आयुक्तांनी त्यांना निलंबित केले आहे. आयुक्तांच्या कडक भूमिकेमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.