नवी मुंबई - शहरात प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने फटकारताच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ऐरोली विभागात शुक्रवारी पाहणी करून प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले, तर संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित का करण्यात येऊ नये, याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ऐरोलीत इमारती बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषणाच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने हे बांधकाम थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. मानक कार्यप्रणालीतील बाबींची पूर्तता केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी संबंधित विकासक मे. जलाराम एंटरप्रायजेस यांना नोटीस दिली आहे.
विशेष पथके पाहणी करणारवायुप्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, पायाभूत सुविधा कामांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त १ आणि २ तसेच शहर अभियंता, सहायक संचालक नगररचना यांची पथके तयार केली आहेत. आयुक्त हे रस्ते, स्वच्छता, बांधकाम यांची पाहणी करणार आहेत.
यांना बजावल्या नोटिसाविशेषत्वाने ऐरोली विभागामधील कामांमध्ये आढळलेल्या उणिवांच्या अनुषंगाने ऐरोली विभाग अधिकारी नैनेश बदले, कार्यकारी अभियंता संजय पाटील व उपअभियंता बंधू शिरोसे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, याविषयी खुलासा मागितला आहे.
Web Summary : Following High Court criticism, Navi Mumbai acts against pollution violations. Three officials face suspension notices. Teams will inspect construction for compliance, ensuring air quality and infrastructure projects adhere to regulations.
Web Summary : उच्च न्यायालय की फटकार के बाद, नवी मुंबई प्रदूषण उल्लंघन के खिलाफ सख्त। तीन अधिकारियों को निलंबन नोटिस। टीमें निर्माण स्थलों का निरीक्षण करेंगी और वायु गुणवत्ता सुनिश्चित करेंगी।