शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

यूपीएससी परीक्षेत पनवेलमधील सुनील शिंदे यांची बाजी; देशभरातून ८१२ रँक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 9:26 PM

पनवेल मधील खांदा कॉलनी याठिकाणी मागील आठ वर्षांपासून सुनील हे वास्तव्यास आहेत.सध्याच्या घडीला आयकर विभागात ते कार्यरत आहेत.

वैभव गायकर,पनवेल: केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पनवेल मधील सुनील राजेंद्र शिंदे (३४) यांनी या परीक्षेत यश संपादित करीत ८१२ रँक मिळवत मराठीसह महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकविला आहे.अतिशय खडतर प्रवास करून सुनील शिंदे यांनी हे यश संपादित केले आहे.विशेष म्हणजे नोकरी करीत असताना शिंदे यांनी हा यशाचे उत्तुंगस्थान गाठले आहे. पनवेल मधील खांदा कॉलनी याठिकाणी मागील आठ वर्षांपासून सुनील हे वास्तव्यास आहेत.सध्याच्या घडीला आयकर विभागात ते कार्यरत आहेत.नोकरी , कुटुंबाला वेळ देऊन त्यांनी हे यश संपादित केले आहे.विशेष म्हणजे सीमाप्रश्नावरून नेहमी चर्चेत असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बिदर जिल्ह्यातील बेलकुनी या छोट्यासहा गावात प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे नांदेड याठिकाणी माध्यमिक शिक्षण सुनील शिंदे यांनी घेतले. यादरम्यान पुढील शिक्षणाकरिता मुंबई गाठून कॉम्पुटर इंजिनिअरींग पूर्ण केले.यावेळी खाजगी कंपनीमध्ये देखील सुनील शिंदे यांनी नोकरी केली. मात्र लहानपणापासून प्रशासनकीय सेवेत येऊन देशाची सेवा करण्याचा ध्येय उराशी बाळगलेल्या सुनील शिंदे हे २०१२ साली आयकर विभागात रुजूले झाले,.यापूर्वी दोन वेळा सुनील शिंदे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मुलाखाती पर्यंत धडक मारली होती. मात्र यशाने दिलेली हुलकावणी समोर हार न मानता सातव्या प्रयत्नात त्यांनी हे यश संपादित केले आहे. नोकरी करीत असताना परीक्षेपूर्वी महिनाभराची सुट्टी घेऊन त्यांनी १२ ते १४ ता आभ्यास करून हे यश संपादित केले आहे.सुनील शिंदे यांच्या कुटुंबात पत्नी दोन मुले , दिवंगत भावाची पत्नी तसेच भावाचा मुलगा असा कुटुंब वास्तव्यास आहे. आई वडील बिदर याठिकाणी बेलकुनी या मूळ गावी वास्तव्यास असल्याचे सुनील शिंदे यांनी सांगितले. दरम्यान कुटुंब, नोकरी सांभाळून सुनील शिंदे यांनी यश संपादित केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून ५ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सहभाग घेत असतात. यापैकी १२ हजार विद्यार्थ्यांची निवड होत असते. यांनतर वेगवेगळ्या विषयांचे पेपर असतात . याकरिता २३०० जण निवडले जातात. त्यानंतर मुलाखत वैगरे घेऊन शेवटच्या टप्प्यात ८२९ विद्यार्थ्यांची निवड होते. हे सर्व दिव्य पार करण्यासाठी जी मेहनत करावी लागते त्या मेहनतीने सुनील शिंदे यांनी हे यशाचे शिखर आहे गाठले आहे. प्रतिक्रिया - आपली बौद्धिक क्षमता ओळखूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षेसाठी उतरणे गरजेचे आहे.या परीक्षेला उतरण्यापुर्वी आपली आर्थिक परिस्थिती मजबुत करण्याची गरज आहे.त्यानंतरच परीक्षेला सामोरे जावे.तसेच प्रचंड मेहनत व ईच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नक्कीच यश मिळवू शकता. -सुनील शिंदे