Such yoga! Hundreds of auto rickshaw get insurance after 'Yoga Day' | असाही योग! 'योगा डे' निमित्त उतरविला शेकडो रिक्षा चालकांचा विमा 
असाही योग! 'योगा डे' निमित्त उतरविला शेकडो रिक्षा चालकांचा विमा 

नवी मुंबई - जगभरात आज जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातही योग दिनाचा मोठा उत्साह दिसत आहे. नवी मुंबईकरांनीही एकत्र येत एकाच ठिकाणी एकाच वेळी योगासने केली. येथील सिटिझन्स फाउंडेशन मागील काही वर्षापासून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहे. या वर्षी योग दिनाच्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा म्हणून भव्य आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाला सिडको आणि आर्ट ऑफ लिविंगचे ही सहकार्य लाभले. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या 100 रिक्षाचालकांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती योजने अंतर्गत विम्याचा हप्ता नवी मुंबई   सिटिझन्स फाउंडेशन ही संस्था भरणार आहे. म्हणजे 100 रिक्षाचालकांना मोफत विमा योजनेचा लाभ घेता येईल.


Web Title: Such yoga! Hundreds of auto rickshaw get insurance after 'Yoga Day'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.