शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अमेटी विद्यापीठावर धडक मोर्चा

By admin | Updated: November 9, 2016 04:04 IST

अमेटी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक सुरू ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांच्या श्री सद्गुरू कृपा शेतकरी संस्थेने भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार

पनवेल : अमेटी विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक सुरू ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांच्या श्री सद्गुरू कृपा शेतकरी संस्थेने भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला असून प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भाताण येथील अमेटी विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला. अमेटी संस्थेने जमीन खरेदी करताना, स्थानिक शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे आश्वासित केले होते. २०१५ मध्ये प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनात अमेटी विद्यापीठ भाताणचे कुलगुरू डॉ. विजय खोले व व्यवस्थापनाने ३६ शेतकऱ्यांना जून २०१६ च्या अखेरपर्यंत कामावर घेण्याचे लेखी पत्र दिले होते. याशिवाय अमेटीमध्ये चालणाऱ्या कंत्राटापैकी ५० टक्के कंत्राटी कामे शेतकरी संस्थेला देण्यात येतील, असेही सांगण्यात आले होते. मात्र गेल्या ६ महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचे कंत्राट देण्यात आले नाही व तसेच शेतकऱ्यांनाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात आले नाही. यासंदर्भात वेळोवेळी अमेटी व्यवस्थापनाला सूचित करण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सामंजस्याने प्रयत्न करण्यात आले, मात्र अमेटी विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद प्रकल्पग्रस्तांना देण्यात आला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी आंदोलन केले. (वार्ताहर)