शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंडशिप डेनिमित्त भेटवस्तू खरेदीला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:00 IST

आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील दुकाने सजली असून, गेल्या दोन दिवसांपासून तरुणांनी खरेदीसाठी गिफ्ट शॉपमध्ये

नवी मुंबई : आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील दुकाने सजली असून, गेल्या दोन दिवसांपासून तरुणांनी खरेदीसाठी गिफ्ट शॉपमध्ये गर्दी केली आहे. विविध रंगाचे फ्रेंडशीप बॅण्ड, भेटकार्ड, मैत्रीची व्याख्या स्पष्ट करणाºया भेटवस्तू, किचेन्स खरेदी करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे.महाविद्यालयीन आयुष्यात मैत्रीला सर्वात अधिक प्राधान्य दिले जात असून, एकमेकांना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून आणि विविध भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. महाविद्यालयांमध्येही या काळामध्ये साडी डे, रोझ डे, चॉकलेट डे, ट्रॅडिशनल डे असे विविध डेज साजरे करण्याचे क्रेझ वाढले आहे. नुकतेच अ‍ॅडमिशन घेऊन विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू झालेले असून, यात नवीन मित्र-मैत्रिणींचे अनेक ग्रुप तयार झाले असून, फ्रेंडशिप डे कसा साजरा करायचा? याचे प्लॅन्सही कॉलेज कट्ट्यावर रंगविण्यात येतात. सेलिब्रेट करण्याचे प्लॅन्स बनवतात. फ्रेंडशिप डेनिमित्त शहरातील बाजारपेठा सजल्या असून, अनेक दुकानांमध्ये मनगटावर बांधण्यासाठी रंगीबेरंगी बॅण्ड्स विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. अगदी पाच रु पयांपासून ४५० रु पयांपर्यंत या बॅण्ड्सच्या किमती आहेत. त्याचबरोबर जवळच्या मित्राला भेटवस्तू देण्याकरिता भेटकार्ड, आकर्षक पॅकिंगमध्ये चॉकलेट्स, किचेन्स, पुस्तक, फोटोंचे कोलाज, मित्रासोबतचा सेल्फी असलेला टी मग आदी वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. सुट्टीमुळे अनेकांनी सहल, गेट टू गेदर असा बेत आखला आहे.