नवी मुंबई- नेरुळमधील सुश्रूषा हाॅस्पिटल ला सोमवारी सकाळी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. रुग्णांना तत्काळ जवळील सामाजिक संस्थेच्या हाॅलमध्ये हलविण्यात आले असून आग विझविण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयातील संगणक यंत्रणेत शाॅर्टसर्किटमुळे ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुश्रूषा हे शहरातील प्रमुख हृदयविकारावर उपचार करणारे रुग्णालय आहे. आग लागल्यानंतर तत्काळ सर्व रुग्णांना हलविण्यात आले आहे. वाशी, नेरूळ, सीबीडी अग्निशमन दलाच्या वाहनांच्या मदतीने आग विझविण्यात येत आहे.
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:25 IST