शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात रोवला शिवकार्याचा झेंडा

By admin | Updated: March 11, 2016 02:48 IST

जुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे.

प्राची सोनवणे, नवी मुंबईजुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८ लाख लोकांमध्ये शिवप्रतिमांचे वाटप करण्यात आले आहे. जुईनगर येथे राहणाऱ्या योगेश खिलारे या तरुणाला नोकरीनिमित्त अमेरिकेला जावे लागले आहे. परदेशी जाऊनही मनातील शिवप्रेम तिळमात्र कमी न होता इतर देशांमध्ये शिवकार्याचा प्रचार करण्याचा निर्धार योगेशने केला आणि वर्षभरात ५००हून अधिक परदेशी नागरिकांना शिवप्रतिमांचे वाटप करून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगितली.व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या सध्याच्या या पिढीला खरोखरच शिवरायांच्या वैचारिक प्रेरणेची गरज असून स्त्रियांविषयीचा आदर, आई-वडिलांविषयीचे प्रेम, कुटुंबाविषयीची आपुलकी तसेच देशसेवा करण्याकरिता तरुणांना अचूक मार्ग दाखविण्याचे कार्य शिवकार्यातून घडत असते, अशी माहिती राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक विजयदादा खिलारे यांनी दिली. लहानपणापासून योगेशवर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असून त्यांची आजी शहाबाई रंगराव खिलारे आणि आजोबा रंगराव चंद्रकांत खिलारे यांच्याकडून शिवकार्याची प्रेरणा मिळाली. योगेशला एका क्रुझवर ८५ देशातील व्यक्ती एकत्र काम करत असून योगेशच्या वाढदिवसाला तलवारीचा केक तयार करून तेथील परदेशी नागरिकांनी शिवरायांच्या नामाचा जयजयकार करत शुभेच्छांचा वर्षाव केला, हा आठवणीतला किस्सा योगेशने सांगितला. ‘लोकमत’शी बोलताना त्याने, प्रत्येक घराघरात शिवचरित्राचे वाचन केले पाहिजे. शिवचरित्रातील विचार प्रत्येकाला प्रेरणा देणारे असून यामुळे भारताचे उज्ज्वल भविष्य घडू शकते. परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देताना प्रतिमा पाहताच बरेचजण शिवरायांचा इतिहास माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात शिवकार्याचा प्रचार व प्रसार सुरू असताना भारतामध्ये मात्र शिवकालीन वास्तूंचे जतन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत योगेश यांनी व्यक्त केली, त्याचबरोबर शिवरायांचा एकेरी उल्लेख केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताचा इतिहास ज्वलंत असून शिवरायांची युध्दनीती, त्यांचे कर्तृत्व, जबाबदारपणा, आत्मविश्वास, कणखरपणा असे अनेक गुण यामधून घेता येण्यासारखे आहेत. लोकांनी शिवरायांवरील प्रेम मनात कायम ठेवून आपल्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये शिवकार्याचे बीज पेरणे गरजेचे आहे असा मोलाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाविषयी महाराजांची खलिते असून शिवकालीन इतिहासापासून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्याचे काम केले जात आहे. तरुणांना व्यसनापासून दूर करण्याचे काम राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या वतीने केले जात आहे.