नवी मुंबईमध्ये 70 लाखांची वाईन जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 15:59 IST2019-03-24T15:57:14+5:302019-03-24T15:59:40+5:30

गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने 70 लाखांची वाईन जप्त केली आहे. अवैधरित्या गोडाऊनमध्ये हा दारूसाठा करण्यात आला होता.

Seven lakh wine seized in Navi Mumbai | नवी मुंबईमध्ये 70 लाखांची वाईन जप्त 

नवी मुंबईमध्ये 70 लाखांची वाईन जप्त 

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने 70 लाखांची वाईन जप्त केली आहे. अवैधरित्या गोडाऊनमध्ये हा दारूसाठा करण्यात आला होता. दारूसाठा जप्त करून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने 70 लाखांची वाईन जप्त केली आहे. अवैधरित्या गोडाऊनमध्ये हा दारूसाठा करण्यात आला होता. तुर्भे एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीत्याठिकाणी छापा टाकला. 

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 6 हजार हून अधिक वाईनच्या बाटल्या आढळून आल्या.  त्याची किंमत 70 लाखांहून अधिक आहे. याबाबत पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, कस्टमच्या लिलावात दारू खरेदी केल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याची कागदपत्रे ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे दारूसाठा जप्त करून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये वाटण्यासाठी हा दारूसाठा करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आजवरची ही सर्वात  मोठी कारवाई आहे.

Web Title: Seven lakh wine seized in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.