उरणामधील सिद्धार्थची  'महाराष्ट्र प्रीमिअर लीग'मध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 16:48 IST2023-06-16T16:47:49+5:302023-06-16T16:48:47+5:30

या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ६ संघांमध्ये क्रिकेटचे युद्ध रंगणार असून एकमेकांचा पराभव करण्यासाठी सर्वच संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.

Selection of Siddharth from Uran in Maharashtra Premier League | उरणामधील सिद्धार्थची  'महाराष्ट्र प्रीमिअर लीग'मध्ये निवड

उरणामधील सिद्धार्थची  'महाराष्ट्र प्रीमिअर लीग'मध्ये निवड

उरण  : उरण तालुक्यातील सिद्धार्थ संजीवन म्हात्रे याची  महाराष्ट्र प्रीमिअर लीग' क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र प्रीमिअर लीग' ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी टि - २० क्रिकेट स्पर्धा असून जून महिन्यात सुरु होत आहे. या स्पर्धेतील खेळाडूंची निवड प्रकिया जुन ( १५ ) रोजी पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ६ संघांमध्ये क्रिकेटचे युद्ध रंगणार असून एकमेकांचा पराभव करण्यासाठी सर्वच संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.

   या स्पर्धेत उरण येथील हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा मुलगा सिद्धार्थ म्हात्रे याची महाराष्ट्र प्रीमिअर लीग' कोल्हापूर टस्कर्स या संघामध्ये निवड झाली आहे. यावेळी पुणेरी बाप्पा पुणे, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स, छत्रपती संभाजी किंग्स  संभाजीनगर, एगल टायटन्स नाशिक आणि कोल्हापूर टस्कर्स अशा महाराष्तील विविध शहरांमधील संघांमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

   दरम्यान सिद्धार्थ म्हात्रे हा केदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर टस्कर्स या संघामध्ये खेळणार आहे.  या स्पर्धेसाठी केदार जाधव, ऋतुराज जाधव, तुषार देशपांडे, राहुल त्रिपाठी असे अनेक आयपीएल मधील खेळाडू सुद्धा सहभागी होणार आहेत. तर या स्पर्धेत अनेक खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळणार आहे.

Web Title: Selection of Siddharth from Uran in Maharashtra Premier League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.