शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

सानपाडा स्टेशन महिलांसाठी असुरक्षित

By admin | Updated: July 27, 2015 02:40 IST

सानपाडा रेल्वे स्थानकात भिकारी, फेरीवाले, तृतीयपंथीयांनी संपूर्ण स्टेशन परिसरावर कब्जा केला आहे. दिवसागणिक या स्थाकातून हजारो प्रवासी

प्राची सोनवणे , नवी मुंबईसानपाडा रेल्वे स्थानकात भिकारी, फेरीवाले, तृतीयपंथीयांनी संपूर्ण स्टेशन परिसरावर कब्जा केला आहे. दिवसागणिक या स्थाकातून हजारो प्रवासी प्रवास करतात. यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र या ठिकाणी कोणत्याही ठोस उपाययोजना राबविल्या जात नाहीत. स्टेशन इमारतीमधील काही रिकामे हॉलचा धर्मशाळेप्रमाणे वापर केला जातो. कोणीही, कधीही या ठिकाणी येऊन राहतात तर रात्रीच्या वेळी या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. वाशी एपीएमसी येथील घाऊक बाजारात जाण्यासाठी या स्थानकाबाहेरुन मार्ग असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. स्थानकाखाली असलेल्या भुयारी मार्गाची आणि तिथल्या रस्त्याची झालेली अवस्था, खड्डे यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात होतात. भुयारी मार्गापासून ते स्थानकापर्यंतचा संपूर्ण रस्त्यावर फेरीवाले आपले दुकान मांडून बसले आहेत त्यामुळे येथील प्रवाशांची अडवणूक होते. फेरीवाले, विक्रेते या ठिकाणी टाकाऊ पदार्थ, उष्टे-खरकटे, केरकचरा, खराब झालेल्या वस्तू जागीच टाकून निघून जातात. त्यांनी केलेला कचऱ्यामुळे संपूर्ण स्थानक परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरलेली आहे. सिडको, रेल्वे प्रशसनाकडून यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने, दिवसेंदिवस फेरीवाल्यांचे प्रमाण वाढते आहे. या ठिकाणी असलेल्या पाणपोईचीही दुरवस्था झाल्याने गळतीची धार लागली आहे. त्यामुळे हे पाणी फलाटावर साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक शौचालये वापरात नसून फक्त नावापुरतीच मर्यादित राहिली आहे. संपूर्ण स्टेशन परिसराच्या समस्या पाहता सिडको व रेल्वे प्रशासनाला केव्हा जाग येणार, हा प्रश्न उभा राहतो.