शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 08:40 IST

Sameer Wankhede's bar : एनसीबीच्या विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसी मधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा बार सुरूच असून, परवाना रद्द झाल्याची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

नवी मुंबई : एनसीबीच्या विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसी मधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा बार सुरूच असून, परवाना रद्द झाल्याची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दरम्यान, परवाना रद्दच्या निर्णयाविरोधात वानखेडे हे न्यायालयात जाणार असल्याचे बारच्या कर्मचाऱ्यांकडून समजते.

समीर वानखेडे हे १७ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे सद्गगुरू हॉटेल आणि बारचा परवाना काढला होता. मात्र, बार परवाना मिळविण्यासाठी परवानाधारकाचे वय २१ वर्षे असणे आवश्यक असतानाही, समीर वानखेडे हे अल्पवयीन असतानाही त्यांच्या नावे बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर १४ डिसेंबरला उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी बारचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवाना मिळवण्यासाठी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

मागील १८ वर्षांपासून नियमित प्रतिवर्षी परवाना नूतनीकरण केला जात आहे. शिवाय प्रत्येक तीन महिन्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बारची पाहणी व परवान्याची पडताळणी केली जाते. यावेळी देखील अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब निसटली कशी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केला परवाना रद्दठाणे  : वाशी येथे एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर सद्गुरु नावाचा एक रेस्ट्रो बार आहे. त्याचे लायसन्स ठाणे  जिल्हाधिकारी यांनी रद्द केले  आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार या बारसाठीचा परवाना ऑक्टोबर १९९७ ला दिला होता. परंतु, त्यावेळेस वानखेडे हे सज्ञान नसल्याने त्याचा परवाना लायसन्स रद्द केल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली. तसेच १९९६ मध्ये सिडकोने जी एनओसी दिली होती, तीत या जागेत केवळ रेस्टाॅरंटला परवानगी असून, मद्य विकण्यास मनाई होती. तरीही तिथे मद्यविक्री सुरू होती. या बारचा परवाना ३१ मार्चपर्यंत वैध आहे. शाहरुखच्या मुलाला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आरोप केले होते.वानखेडे यांच्या   वयात विसंगतीसज्ञान नसताना बारचा परवाना घेतल्याच्या आरोप होता. यासाठी वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच वयात विसंगती असल्याचे कारण दिले आहे. बारला परवाना दिला होता, त्यावेळेस वानखेडे हे सज्ञान नसल्यानेच तो रद्द केला. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNavi Mumbaiनवी मुंबई