शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमधील तेरणा विद्यालयाकडून पालक वर्गाची लूट

By admin | Updated: June 28, 2017 03:34 IST

नेरुळमधील तेरणा विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली आहे. २२८० रुपयांचे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नेरुळमधील तेरणा विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली आहे. २२८० रुपयांचे साहित्य खरेदी करणाऱ्या पालकांना गणेश बुक स्टोअर्स दुकानाची १०९९ व तेरणा विद्यालयाची संगणक फीसाठी ११८१ रुपयांची पावती देण्यात आली आहे. पालकांची अक्षरश: लुबाडणूक करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने याप्रकरणी हस्तक्षेप करून पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. नवी मुंबईमध्ये सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या फीमध्ये शिक्षण देणाऱ्या मोजक्या शिक्षण संस्थांमध्ये नेरुळमधील तेरणा विद्यालयाचा समावेश होत होता. माथाडी वसाहत, नेरुळ, कुकशेत व सारसोळे गाव व सर्वसामान्य नागरिकांच्या वस्तीमध्ये ही शाळा आहे. कमी फी व चांगले शिक्षण यामुळे शाळेत प्रवेशासाठी पालकांची प्रथम पसंती मिळू लागली होती; पण काही वर्षांपासून भरमसाठ फी वाढविण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली. पालकांचा विरोध डावलून जादा किमतीमध्ये साहित्य खरेदी करावी लागली होती. राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेनेने आंदोलन केल्यानंतरही एक रुपया फीही कमी करण्यात आली नाही. यावर्षीही शाळा व्यवस्थापनाने २२८० रुपयांचे साहित्यखरेदी करण्याची सक्ती केली आहे. वर्गनिहाय ही रक्कम वेगवेगळी आहे. पालकांकडे यापूर्वीच ज्या वस्तू आहेत, त्याही पुन्हा खरेदी करण्यास भाग पाडले आहे. व्यवस्थापनाच्या सक्तीमुळे पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदी केले आहे. साहित्य खरेदी केल्यानंतर प्रत्येक वस्तूची किंमत असलेली पावती सर्वांना देणे आवश्यक असते; परंतु व्यवस्थापनाने गणेश बुक स्टोअर्सच्या नावाने १०९९ रुपयांची पावती दिली आहे. या पावतीमध्ये संबंधित बुक स्टोअर्सचा पत्ता, संपर्क नंबरचा उल्लेखही केलेला नाही. तेरणा विद्यालयाच्या नावाने ११८१ रुपयांची पावती दिली. पावतीमध्ये संगणक फीचा उल्लेख केला आहे; परंतु कोणते शिक्षण दिले जाणार आहे, याचा तपशील दिलेला नाही. व्यवस्थापनाच्या पिळवणुकीविरोधात कोणाकडे आवाज उठवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.