जमिनी खाली बोगदा खोदून नवी मुंबईत लुटली बँक, कोट्यवधीचा ऐवज चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 02:26 PM2017-11-13T14:26:06+5:302017-11-13T17:19:45+5:30

नवी मुंबईतील जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. जमिनी खालून भुयार खोदून भुयारी मार्गाने चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला.

Robbery in Navi Mumbai | जमिनी खाली बोगदा खोदून नवी मुंबईत लुटली बँक, कोट्यवधीचा ऐवज चोरीला

जमिनी खाली बोगदा खोदून नवी मुंबईत लुटली बँक, कोट्यवधीचा ऐवज चोरीला

Next

नवी मुंबई - जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. जमिनी खाली बोगदा खोदून भुयारी मार्गाने चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला व दरोडा टाकला. फरार दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. जुईनगर सेक्टर 11 मधील ही घटना आहे. बँक ऑफ बडोदातील ग्राहकांच्या 237 लॉकर पैकी 27 लॉकर्सवर चोरट्यांनी हात साफ केला आहे. या सर्व लॉकरमध्ये सोन्याचे दागिने होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अत्यंत शिताफीने बँकेच्या शेजारी असलेल्या खाद्य पदार्थाच्या दुकानातून चोरट्यांनी भुयारी मार्ग बनवला व बँकेवर दरोडा घातला. 

Web Title: Robbery in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा