शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 02:29 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : सायन-पनवेल मार्गावरील प्रकार

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महामार्गाची देखभाल दुरु स्ती केली जाते. काँक्रीटीकरण केलेल्या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने वाहने आदळत आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महामार्गाची रुंदी वाढवून ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी काँक्रीटीकरणही करण्यात आले आहे; परंतु या महामार्गाची स्वच्छता, देखभाल आणि दुरु स्तीकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. नेरु ळ, जुईनगर, सानपाडा, सीबीडी आदी ठिकाणी महामार्गावर काँक्रीटीकरणाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने वाहने आदळत असून दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या महामार्गाची स्वच्छता होत नसल्याने महामार्गाच्या कडेला कचरा, रेती, माती, मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. यामुळे आजवर लहान वाहनांचे अनेक अपघात झाले असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गाची स्वच्छता होत नसल्याने नवी मुंबई शहरातील अनेक नोडच्या महामार्गावरील प्रवेशद्वाराला बकाल रूप आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाची स्वछता, देखभाल आणि दुरु स्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनांचे अपघात होत आहेत. तर खड्ड्यामुळे वाहने उखडत असल्याने आरोग्याच्या व्याधीही बळावत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईroad safetyरस्ते सुरक्षा