शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

By admin | Updated: May 31, 2017 04:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी

प्राची सोनवणे/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च २०१७दरम्यान झालेल्या या परीक्षेला बसलेल्या ३० विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय बोर्डाने दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पसरविणाऱ्या ६ विद्यार्थ्यांना परीक्षाबंदी करण्यात आली असून, पुढील अडीच वर्षे या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचा खुलासा मुंबई बोर्डाचे प्रभारी सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी केला. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये ३ विद्यार्थी अपात्र, १५ विद्यार्थी चौकशीकरिता राखीव, ९ विद्यार्थी आयसोलेटेड विषयांमुळे तर ३ विद्यार्थ्यांचे निकाल हे इतर त्रुटींमुळे राखीव ठेवण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या नियमानुसार परीक्षाबंदी लागू करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची यंदाची परीक्षा रद्द केली असून, यापुढील पाच परीक्षा देता येणार नसल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली. २०२०मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला हे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. मुंबई विभागीय बोर्डाच्या वतीने १७ कॉपी प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. विभागातील पुनर्परीक्षार्थी आणि विद्यार्थी संख्येत झालेल्या वाढीमुळे निकालाचा टक्का घसरल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐनवेळी परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढल्याची माहिती देताना परीक्षेच्या एक तास अगोदरही अर्ज स्वीकारून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आल्याची माहिती विभागीय सचिवांनी दिली. परीक्षेच्या दिवशी सकाळी १० वाजता अर्ज करून एका विद्यार्थ्याला वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे परीक्षेला बसविण्यात आले होते.