शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

हेटवणेत आरक्षित पाणी पडून

By admin | Updated: December 29, 2015 00:26 IST

हेटवणे धरणात सिडकोचा आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणीसाठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले आहे.

पनवेल : हेटवणे धरणात सिडकोचा आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणीसाठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले आहे. मुबलक पाणी असूनही केवळ व्यवस्था नसल्याने सिडको वसाहतींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर पाण्यासाठी एमजेपी आणि नवी मुंबई महापालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत चार हजार ४० सदनिका आणि दोन हजार ६५० सोसायट्या आहेत. कळंबोलीत पाच हजार ९०० सदनिका आणि सुमारे ११५० सोसायट्या आहेत. या सर्व ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याकरिता सिडको दररोज एमजेपीकडून ८५ एमएलडी पाण्याची गरज आहे. खारघर आणि कामोठे येथे सुमारे पाच हजारांच्या जवळपास ग्राहक असून, त्यांना ४०९ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. याकरिता नवी मुंबई महापालिकेकडून ३८ एमएलडी पाणी घ्यावे लागते.पेण परिसरात ८६.३५ कोटी खर्च करून पाटबंधारे विभागाने सिडकोच्या सहकाऱ्याने हेटवणे धरण बांधले. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १४७.४९ द.ल.घ.मी. इतकी आहे. त्यापैकी १४४.९८ द.ल.घ.मी. साठा उपयुक्त असून, १०० एमएलडी पाणी सिडकोला देण्याची अट ठेवण्यात आली होती. या वर्षी मार्चमध्ये या करारनाम्यात बदलून पाणीकोटा ५० ने वाढून १५० एमलडी करण्यात आला आहे. सिडकोने या ठिकाणाहून जलवाहिनी पूर्वीच टाकली असून, तिची क्षमता अतिशय कमी असल्याने आवश्यक पाणी सिडको वसाहतींना देतात येत नाही. त्याचबरोबर पंपिंगची क्षमतासुध्दा अतिशय कमी आहे. या कारणाने कमी दाबाने पाणी मिळते. ५४,७५० एमएलडी आरक्षित पाणी हेटवणे प्रकल्प विभागाकडे मागितलेल्या माहितीनुसार सिडकोला दरवर्षी ५४,७५० इतके पाणी आरक्षित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यापैकी सिडको वर्षाला फक्त ३६,५०० एमएलडी पाणीच वापरीत असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे १८,२५० एमएलडी पाणी धरणात शिल्लक राहत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.सिडको वसाहतीला दररोज २१६ एमएलडी पाण्याची गरज आहे. एमजेपी आणि नवी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर हेटावणे धरणातून पाणी उचलून ते रहिवाशांना पुरवले जाते. आजूबाजूला ७९ गावांना सिडको पाणी देते. सध्या सुमारे 30 एमएलडी पाणी कमी पडते, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर सध्या हेटावणे धरणातून आम्ही पाणी घेते, मात्र पंपिंग क्षमता कमी असल्याने अडचणी येतात. येत्या काही महिन्यांत सगळे कामे पूर्ण करून १५० एमएलडी पाणी या धरणातून घेण्यात येईल.- रमेश गिरी, अधीक्षक अभियंता सिडको, पाणीपुरवठा विभाग