शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण - शंभूराज देसाई

By नामदेव मोरे | Updated: July 15, 2024 00:09 IST

आरक्षणाच्या बैठकीपासून विरोधकांनी पळ काढल्याचा आरोप

मुंबई : ओबीसींचे आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीपासून तीनही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पळ काढला. पण सरकार थांबलेले नाही. आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये एकही दिवस वाया घालविला नसल्याचे मत उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.              नवी मुंबईमध्ये पाटण तालुक्यातील रहिवाशांच्या मेळाव्याप्रसंगी माध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई यांनी मराठा आरक्षणाविषयी मत व्यक्त केले. कोणाचे आरक्षण काढून दुसऱ्याला दिले जाणार नाही. ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे. शासनाने स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे ते कोर्टात टिकेल. कुणबी प्रमाणपत्रासाठीची कार्यवाही सुरू आहे. 

हैद्राबाद संस्थानामधील नोंदी तपासण्यात आल्या आहेत. तेथील सर्व दाखले प्रमाणाीत करून ताब्यात घेण्यात येणार आहेत. एक महिन्यापुर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तेव्हापासून आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये एक दिवसही वाया घालविलेला नाही. ओबीसी व मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. पण त्या बैठकीपासून तीनही प्रमु्ख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पळ काढल्याची टिकाही त्यांनी केली.

मेळाव्यात बोलताना महायुती सरकारने दोन वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विरोधक खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या नरेटीव्हला बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मेळाव्यास शिंदे सेनेचे उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, विजय माने, यांच्यासह पाटण तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईMaratha Reservationमराठा आरक्षण