शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’तील भूधारकांवर लारचे सावट

By admin | Updated: December 24, 2015 01:46 IST

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे महामार्गालगतच्या परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यासाठी चार किमीचे क्षेत्र संपादित केले जाणार आहे

कमलाकर कांबळे, नवी मुंबईमहाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे महामार्गालगतच्या परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यासाठी चार किमीचे क्षेत्र संपादित केले जाणार आहे. केंद्र शासनाचा सुधारित भूसंपादन कायदा म्हणजेच लॅण्ड अक्वायझिशन, रिहॅबिटेशन अ‍ॅण्ड रिसेटलमेंट अ‍ॅक्टनुसार (लार) हे भूसंपादन केले जाणार आहे. संपादित होणारा बहुतांशी परिसर सिडकोच्या नैना क्षेत्रात मोडत असल्याने येथील भूधारकांचे धाबे दणाणले आहेत. रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाची निर्मिती केली आहे. आता या महामार्गालगतच्या परिसराचा विकास करण्याची एमएसआरडीसीची योजना आहे. महामार्गालगतचे दोन्ही बाजूचे चार किमी क्षेत्र संपादित केले जाणार आहे. संपादित केल्या जाणाऱ्या क्षेत्रात पनवेल, कर्जत व खालापूर या तीन तालुक्यातील जमिनीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या तिन्ही तालुक्यांतील बहुतांशी गावांचा सिडकोच्या नैना क्षेत्रात समावेश आहे. नैनाला विरोध करणाऱ्या भूधारकांना भविष्यात एमएसआरडीसीच्या माध्यमातून सक्तीच्या भूसंपादनाला समोरे जावे लागणार आहे. नैना प्रकल्पातील भूधारकांनी समूह शहर विकासासाठी पुढाकार घ्यावा यासाठी सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या धर्तीवर ६0 हजार हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर शेतकऱ्यांनी छोट्या-मोठ्या शहरांचा विकास करावा, यासाठी सिडको आग्रही आहे. त्यासाठी सिडकोने नैना स्कीम तयार केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान १0 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. त्यातील ४0 टक्के जमीन सिडकोला विनामूल्य हस्तांतरित करावी लागणार आहे. त्या बदल्यात संबंधित भूधारकांना उरलेल्या ६0 टक्के जमिनीवर १.७ एफएसआय मिळणार आहे. तसेच हस्तांतरित होणाऱ्या ४0 टक्के जमिनीतून सिडको रस्ते, मोकळी मैदाने, उद्याने व इतर सुविधा उपलब्ध करणार आहे. त्यामुळे अधिकाधिक भूधारकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असा सिडकोचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे सिडको नैना क्षेत्रातील जमिनी संपादित करणार नाही.