नवी मुंबईला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले,  दक्ष राहण्याचे महानगर पालिकेचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 11:58 IST2025-05-26T11:56:50+5:302025-05-26T11:58:02+5:30

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Rains lashed Navi Mumbai with thunder and lightning, the Municipal Corporation appealed to be vigilant | नवी मुंबईला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले,  दक्ष राहण्याचे महानगर पालिकेचे आवाहन 

नवी मुंबईला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले,  दक्ष राहण्याचे महानगर पालिकेचे आवाहन 


नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिका कार्यक्षेत्रात रात्रीपासून पाऊस सुरू आहे.पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सकाळी कामावर जाणा-या चाकरमान्यांची धावपळ झाली. पावसाने काही ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. 

 महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज सकाळी लवकरच सर्व विभागप्रमुख व विभाग अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात मदत कार्यासाठी कार्यरत झाले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोणताही प्रकारच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 022-27567060 किंवा 022-27567061 या क्रमांकावर अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आहे

Web Title: Rains lashed Navi Mumbai with thunder and lightning, the Municipal Corporation appealed to be vigilant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.