शहरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 02:11 IST2019-06-11T02:11:04+5:302019-06-11T02:11:20+5:30
नवी मुंबईसह पनवेल परिसरामध्ये मार्चपासून तीव्र उकाडा सुरू झाला होता.

शहरात पावसाची हजेरी
नवी मुंबई : वाशीसह नेरूळ परिसरामध्ये रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सोमवारी रात्री पनवेल परिसरामध्ये पाऊस पडला असून तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला.
नवी मुंबईसहपनवेल परिसरामध्ये मार्चपासून तीव्र उकाडा सुरू झाला होता. गरमीमुळे हैराण झालेले शहरवासीही पावसाची वाट पाहू लागले होते. रविवारी सायंकाळी विजांचा कडकडाट सुरू झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडेल असे वाटू लागले होते. वाशी, नेरूळसह काही परिसरामध्ये तुरळक सरी पडल्या. पहिल्याच पावसात नेरूळ सेक्टर-१६ मध्ये पथदिव्याचा खांब कोसळला. लहान मुलांनी भिजण्याचा आनंद घेतला. सोमवारी सायंकाळपासूनही विजांचा कडकडाट सुरू झाला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पनवेल परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली.