राहुल पाटील याला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात, विविध कलमान्वये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 11:47 IST2024-03-15T11:46:33+5:302024-03-15T11:47:33+5:30

...तेव्हा यातील आरोपी राहुल पाटील याने बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून लोकांना जमवून विजयी बैलाचे समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव करुन आरडा ओरड केली. यावेळी राहुल पाटील याचे समर्थकांनी दगडफेक करून शिवीगाळी केली. तसेच जोरजोरात आरडा ओरडा केला.

Rahul Patil was taken into custody by the Panvel city police, a case was registered under various sections | राहुल पाटील याला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात, विविध कलमान्वये गुन्हा दाखल

राहुल पाटील याला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात, विविध कलमान्वये गुन्हा दाखल

नवीन पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्यात राहुल पाटील (राहणार आडवली ) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

ओवळे येथे 12 मार्च रोजी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीमध्ये राहुल पाटील व जयेश यांच्या वतीने सहभागी असलेल्या बैलगाड्यांची शर्यत झाली. त्यावेळी जयेश पाटील गटाची बैलगाडा जोडी विजयी झाल्यानंतर त्या बैलजोडीच्या चाहत्यांनी विजयी बैल जोडीसह फोटो काढून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली.

तेव्हा यातील आरोपी राहुल पाटील याने बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून लोकांना जमवून विजयी बैलाचे समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव करुन आरडा ओरड केली. यावेळी राहुल पाटील याचे समर्थकांनी दगडफेक करून शिवीगाळी केली. तसेच जोरजोरात आरडा ओरडा केला. त्यातील चॉकलेटी रंगाचा फुल बाहयांचा शर्ट व जिन्स पॅन्ट घतलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या ताब्यातील अग्नीशस्त्राने बैलगाडा शर्यतीमध्ये जमलेल्या जनसमुदायाच्या दिशेने हवेत एक राउंड गोळीबार केला. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटील याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: Rahul Patil was taken into custody by the Panvel city police, a case was registered under various sections