अपघातात आई-वडिलांचं छत्र हरपलं, सुदैवानं ते चिमुकले थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 10:41 IST2018-12-23T10:28:55+5:302018-12-23T10:41:36+5:30
खारघर येथे झालेल्या अपघातात दोन चिमुकल्यांना स्वतःच्या आई-वडिलांना गमवावं लागलं आहे.

अपघातात आई-वडिलांचं छत्र हरपलं, सुदैवानं ते चिमुकले थोडक्यात बचावले
नवी मुंबई- खारघर येथे झालेल्या अपघातात दोन चिमुकल्यांना स्वतःच्या आई-वडिलांना गमवावं लागलं आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर पूर्णा साइटजवळ एक वॅगनर गाडी आणि कंटेनरचा अपघात झाला. बंगलोरहून खारघर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असताना या वॅगनर गाडीला अपघात झाला. या अपघातात वॅगनर गाडीत चार जणांचं एक कुटुंब होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
या कुटुंबातील आई-वडील असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलं थोडक्यात बचावली आहेत. दैव बलवत्तर म्हणून दोन चिमुकली मुलं या अपघातातून बचावली असून, ती सुखरूप आहेत. समर्थ आणि साथी अशी या मुलांची नावं असून, आई संजना अंकित चूघ आणि वडील अंकित भूपेंद्र सिंग चूघ यांचा जागीच मृत्यू झाला आहे.