शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गडकिल्ले, नाणी प्रदर्शन

By admin | Updated: February 20, 2017 06:35 IST

कोपरखैरणेतील ज्ञानविकास शाळेत शनिवारपासून गडकिल्ल्यांचे चित्रप्रदर्शन आणि शिवकालीन नाणी प्रदर्शनाला सुरुवात

नवी मुंबई : कोपरखैरणेतील ज्ञानविकास शाळेत शनिवारपासून गडकिल्ल्यांचे चित्रप्रदर्शन आणि शिवकालीन नाणी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. ऐरोलीतील आपला कट्टा आणि श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या प्रदर्शनाची सांगता झाली असून दोन दिवसांमध्ये तीन हजारांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांनी भेट दिली.या प्रदर्शनात महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील किल्ले तसेच शिवकालीन नाणी पाहण्याची संधी मिळत आहे. शिवकालीन तलवारी, ढाल, कट्यार आदी शस्त्रांविषयीची माहिती तसेच शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदाचे चौथे वर्ष असून पुस्तकातील इतिहासापेक्षा प्रत्यक्षात इतिहास कळावा याकरिता हे प्रदर्शन भरविल्याची माहिती आपला कट्टाचे सदस्य पंकज भोसले यांनी सांगितले. भारतीय टपाल विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेली विशेष लिफाफे आणि टपाल तिकिटे देखील या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. ज्या भागात प्रत्यक्ष भेट देऊन गडकिल्ले पाहता येणार नाही अशा ठिकाणी शिवशाहीच्या साथीदारांनी स्वत: काढलेले दुर्मीळ छायाचित्र हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले. शनिवार सकाळपासून परिसरातील शाळांमधील अनेक विद्यार्थी तसेच पालकांनी या प्रदर्शनाला भेट देत गड किल्ल्ल्यांमागचा इतिहास जाणून घेतला. दुर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश या माध्यमातून दिला जात असून ऐतिहासिक ठेवा जपण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ज्ञानविकास विद्यालयाचे संस्थापक अ‍ॅड. पी.सी. पाटील, संचालिका जयश्री पाटील, आपला कट्टाच्या अध्यक्ष ममता भोसले, उपाध्यक्ष मोहन हिंदळेकर, सचिव दीपक देसाई, पंकज भोसले, सिध्देश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.