शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीतील निदर्शनाच्या निर्णयावर प्रकल्पग्रस्त ठाम

By admin | Updated: October 10, 2015 00:27 IST

जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची एकीकडे भाजपाच्या रामशेठ ठाकूर, महेश बालदी यांनी जोरदार तयारी चालविली असतानाच दुसरीकडे

उरण : जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची एकीकडे भाजपाच्या रामशेठ ठाकूर, महेश बालदी यांनी जोरदार तयारी चालविली असतानाच दुसरीकडे जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांची साडेबारा टक्के भूखंड वाटपाबाबत केंद्राने चालवलेल्या फसवणूक प्रकरणाचा ठपका ठेवीत मोदींचा निषेध, निदर्शने आणि काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम उरण तालुका संघर्ष समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून जाहीर केला आहे. ११ आॅक्टोबर रोजी करळफाटा येथे जाहीर केलेल्या निषेधाच्या कार्यक्रमप्रसंगी वेळ पडल्यास अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याची तयारी चालविल्याने मोदींच्या कार्यक्रमालाच गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या ३१ वर्षांत साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न मार्गी लागला नाही. केंद्रात मागील वर्षी स्थानापन्न झालेल्या मोदी सरकारने जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न सहा महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप पूर्तता न झाल्याने, शेतकऱ्यांमध्ये केंद्र, राज्य आणि जेएनपीटीविरोधात तीव्र असंतोष आहे. वारंवार आश्वासने देवून भूखंड न मिळाल्याने केंद्र, राज्य आणि जेएनपीटीविरोधातील संघर्ष अगदी शिगेला पोहोचला आहे. त्यामुळेच ११ आॅक्टोबर रोजी चौथ्या बंदराच्या पायाभरणीसाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचा निषेध नोंदवत निदर्शने आणि काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतला आहे. पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अथवा अटकसत्र सुरू केल्यास आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेस सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष आमदार मनोहर भोईर, दिनेश पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)न्यायहक्कासाठी भाजपा कटिबध्द - रामशेठ ठाकूरजेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा १२.५ टक्केचा प्रश्न गेल्या ३१ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मनात प्रचंड असंतोष असून वर्षानुवर्षे भिजत पडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा कटिबध्द असून येत्या ३ महिन्यात १२.५ टक्के प्रश्न सुटणार असल्याची ग्वाही माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी नवघर येथील पत्रकार परिषदेत दिली. जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यासाठी त्यांना काळे झेंडे किंवा विरोध न करता सर्वांनी विकासाच्या मुद्यावर एकत्र यावे असे आवाहन रामशेठ यांनी यावेळी केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ भोईर आदी उपस्थित होते.