शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

खांदा वसाहतीत वाहतूक कोंडीची समस्या

By admin | Updated: December 22, 2016 06:34 IST

खांदा वसाहतीमधील नागरिक सध्या वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अस्ताव्यस्त

पनवेल : खांदा वसाहतीमधील नागरिक सध्या वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अस्ताव्यस्त पार्क के ली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या बाजूलाच वाहतूक कोंडी होत असून छोट्या-मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे.मध्यमवर्गीयांची वस्ती म्हणून सुपरिचित असलेल्या खांदा वसाहतीला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. परिसरातील सेक्टर १०, ८, ९, १३ मध्ये तर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सिडकोने जवळपास २५ वर्षांपूर्वी येथील वसाहतींची उभारणी केली. परंतु खांदा कॉलनी शहरात लाखोंची वस्ती आहे. आजही या वसाहतीमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यातच शहरात हॉटेल, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील वाहनांची संख्या देखील प्रचंड आहे. मात्र असे असूनही खांदा कॉलनी शहरात वाहतूक पोलीस फिरकत नसल्याचे रहिवाशांंचे म्हणणे आहे. शिवाजी चौकात देखील वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस तैनात केले तर बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांना चाप बसेल व खांदा वसाहतीतील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.शनिवारी पोलीस स्टेशनच्या बाजूलाच एका महिलेच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात ही महिला थोडक्यात बचावली. मात्र ही महिला जखमी झाली. खांदा वसाहत सेक्टर ८ मध्ये खांदेश्वर पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. विविध तक्र ारी दाखल करण्यासाठी नागरिक येत असतात, तसेच शेजारीच हॉटेल असल्यामुळे रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त चारचाकी व दुचाकी गाड्या पार्क करत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अस्ताव्यस्त वाहने उभी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.