शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य; अपघातांची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:21 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वर्तविण्यात येत असून, या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.नवी मुंबई शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग हा कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईमध्ये येण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे रुंदीकरण करून ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधले आहेत, परंतु महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने, दरवर्षी या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. सीबीडी-बेलापूर ते वाशीदरम्यान अनेक ठिकाणी महामार्ग खडबडीत झाला असून, रस्त्यावर ठिकठिकाणी रेती पसरलेली आहे. महामार्गाच्या या दुरवस्थेमुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने, पावसाळ्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे, परंतु नागरिकांची गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक बस आणि खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून गावी जाणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत.रेल्वे बंद असल्याने महामार्गावर ताण वाढला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेगही मंदावला असून, ठिकठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. महामार्गावरील शिरवणे फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्यावरून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अपघातांची शक्यता निर्माणझाली असून, सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डेनवी मुंबई शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, अनेक ठिकाणचे रस्ते खडबडीत झाले आहेत.सायन-पनवेल महामार्गाच्या शेजारून जुईनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाºया सर्व्हिस रस्त्याचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे, याकडे महापलिकेचे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :Potholeखड्डे