शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

शहरात प्रदूषण, अपुऱ्या पाणीपुरवठ्याची चिंता, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:46 AM

Panvel News : पनवेल शहराची व्याप्ती वाढत चालली आहे. झपाट्याने येथील लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या दृष्टीने वाहनांची संख्या वाढणार आहे. याबाबत पालिकेने आत्ताच नियोजन करण्याची गरज आहे. पालिकेला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने स्वतःच्या मालकीच्या धरणाची नितांत आवश्यकता आहे.

- वैभव गायकर पनवेल : पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पनवेल महानगरपालिकेला चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. पूर्वाश्रमीची नगरपरिषद, २३ ग्रामपंचायती आणि पाच सिडकोचे नोड एकत्रित करून पालिका स्थापन कारण्यात आली आहे. या पालिकेत सध्याच्या घडीला वाढते प्रदूषण, वाहतूककोंडी, पाणीपुरवठा आदी महत्त्वाच्या समस्या बनल्या आहेत. या व्यतिरिक्त इतरही समस्या आहेत.पनवेल शहराची व्याप्ती वाढत चालली आहे. झपाट्याने येथील लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या दृष्टीने वाहनांची संख्या वाढणार आहे. याबाबत पालिकेने आत्ताच नियोजन करण्याची गरज आहे. पालिकेला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने स्वतःच्या मालकीच्या धरणाची नितांत आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला पालिका सिडको, एमआयडीसी, इमजेपी आदी प्राधिकरणाकडून पाणी घेत आहे. 

 अपुरा पाणीपुरवठा पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा करील, असे स्वतःच्या मालकीचे धरण नाही. त्यामुळे दररोज सुमारे ३१० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे.सिडको क्षेत्रात अद्यापही पाणीपुरवठा सिडको प्राधिकरण करीत आहे. सिडको आणि पालिकेचे अधिकारी  जबाबदारी झटकण्याचे काम करतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो. -ॲॅड.बाळासाहेब भोजने, खारघर 

वाहतूककोंडीची समस्यापनवेलमध्ये पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने नागरिकांना रस्त्यावर वाहने पार्क करावी लागत आहेत. वाहतूककोंडी नियंत्रित करण्यासाठी पालिका ट्रॅफिक वार्डन नियुक्त करणार आहे. शहरात जास्तीतजास्त पार्किंगची जागा व अंतर्गत रस्त्यांचे नियोजन याबाबत आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. -अमित रणदिवे, नागरिक,पनवेल  

कचऱ्याचे ढीग कायमकचरा, प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. तळोजा एमआयडीसीमधील काही कारखानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने, खारघर, कळंबोली, कामोठे, तसेच तळोजा परिसरात नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत पालिकेने पुढाकार घेऊन प्राधिकरणाशी समन्वय साधून प्रदूषण कमी करण्याची गरज आहे. -मंगेश रनावडे, नागरिक, खारघर घरांचा प्रश्नपालिकेच्या स्थापनेला ४ वर्षांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही २९ गावांतील जुन्या व मोडकळीस आलेल्या घरांना पुनर्बांधणीची परवानगी पालिका देत, नसल्याने हजारो ग्रामस्थ पालिकेपुढे हातबल झाली आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात प्राथमिक सुविधांचा आभाव आहे. मोडकळीस आलेली घरे ग्रामीण भागातील नागरिक दुरुस्त करू शकत नाही. यामुळे अपघात होऊ शकतो.-संतोष तांबोळी, नागरिक, कोपरा गाव 

ड्रेनेजची अडचणप्रत्येक नोडमध्ये ड्रेनेजची व्यवस्था साफसफाई केली जात नसल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहताना नजरेस पडते.नागरिकांना समस्या नेमकी   कोणाकडे घेऊन जावे, हा प्रश्न पडतो. ड्रेनेजची साफसफाई व्यवस्थितरीत्या केली जात नसल्याने ड्रेनेजचे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहताना दिसते.-प्रशांत कदम, नागरिक, कळंबोली 

महानगरपालिकेत भाजपची सत्तापनवेल महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने पनवेल महानगरपालिकेची संकल्पना अस्तित्वात आली होती. महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत भाजपची या ठिकाणी एकहाती सत्ता आहे. शेकाप या ठिकाणी विरोधी पक्षात आहे. असे असले, तरी शहरातील समस्यांकडे बघणे महत्त्वाचे आहे. 

 पालिकेच्या स्थापनेला चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून पालिका क्षेत्रातील समस्या सोडविण्यावर भर दिला आहे. अमृत योजनेमुळे १०० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. या व्यतिरिक्त प्रदूषण, वाहतूककोंडी आदींसह सर्व समस्या सुटण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. - डॉ.कविता चौतमोल, महापौर, पनवेल

टॅग्स :panvelपनवेल